INDvWI : वनडे आणि टी-20 साठी विंडीजने मैदानात उतरवलाय तगडा संघ!

वृत्तसंस्था
Friday, 29 November 2019

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ख्रिस गेल अजूनही ट्‌वेन्टी-20 प्रकारात खेळत आहे, परंतु त्याने अगोदर अफगाणिस्तान आणि आता भारताविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतलेली आहे.

सेंट जोन्स : भारत आणि वेस्ट इंडिज या दोन संघांमध्ये डिसेंबर महिन्यात तीन ट्‌वेन्टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे. या मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ गुरुवारी जाहीर केला आहे.   

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

अफगाणिस्तानविरुद्धची ट्‌वेन्टी-20 मालिका काहीच दिवसांपूर्वी गमावलेली असली तरी वेस्ट इंडीजच्या ट्‌वेन्टी-20 सह एकदिवसीय संघाच्याही नेतृत्वपदी किएरॉन पोलार्डची निवड कायम ठेवण्यात आली आहे. पुढील महिन्यात वेस्ट इंडीजचा संघ भारताविरुद्ध मालिका खेळणार आहे. 

वेस्ट इंडीजचा संघ गेल्या दोन महिन्यांपासून भारतातच आहे. लखनौ येथे अफगाणिस्तानविरुद्ध एकदिवसीय, ट्‌वेन्टी-20 आणि एकमेव कसोटी सामना खेळत आहे. एकदिवसीय आणि कसोटी सामना जिंकला असला तरी ट्वेन्टी-20चे विद्यमान विश्‍वविजेते असूनही त्यांना अफगाणिस्तानविरुद्ध 1-2 अशी हार स्वीकारावी लागली होती. 

- फ्युचर प्लॅनविषयी विचारले असता धोनी म्हणाला,...

गेलची अनुपलब्धता आणि रसेलची माघार 

एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला ख्रिस गेल अजूनही ट्‌वेन्टी-20 प्रकारात खेळत आहे, परंतु त्याने अगोदर अफगाणिस्तान आणि आता भारताविरुद्धच्या मालिकेतूनही माघार घेतलेली आहे. त्याचबरोबर आंद्रे रसेलने दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. 

ट्‌वेन्टी-20 मालिकेतील सामने हैदराबाद (6 डिसेंबर), तिरुअनंतपुरम (8 डिसेंबर) आणि मुंबई (11 डिसेंबर) येथे होणार आहेत; तर चेन्नई (15 डिसेंबर), विशाखापट्टणम (18 डिसेंबर) आणि कटक (22 डिसेंबर) येथे एकदिवसीय सामने होणार आहेत. 

- चौथ्या क्रमांकासाठी पर्याय सापडला; निवड समितीने केले शिक्कामोर्तब!

संघ जाहीर झाल्यानंतर वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक फिल सिमन्स म्हणाले, ''भारताविरुद्ध आम्ही तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार असल्यामुळे आमच्या संघाला आणखी सामने भारतात खेळण्याची संधी मिळाली आहे. अफगाणिस्तानविरुद्ध आम्ही वनडे सामने खेळलो. मात्र, भारताविरुद्ध भारतात खेळणे थोडे कठीण काम आहे.'' 

ते पुढे म्हणाले, ''आगामी ट्वेन्टी-20 विश्वकरंडक ऑस्ट्रेलियामध्ये 2020 पार पडणार आहे. त्यानंतर 2021 ची विश्वकरंडक स्पर्धा भारतामध्ये होणार आहे. यासाठी आम्हाला याचा फायदा होईल.'' 

- आयपीएल लिलाव होण्यापूर्वी द्रविडने दिला महत्त्वाचा सल्ला, म्हणाला...

एकदिवसीय संघ : 

किएरॉन पोलार्ड (कर्णधार), सुनील आम्ब्रीस, शेय होप, खेरी पेरी, रॉस्टन चेस, अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल, ब्रॅंडन किंग, निकोलस पूरन, शिमरॉन हेटमेर, एविन लुईस, रोमारिओ शेफर्ड, जेसन होल्डर, किमो पॉल, हेडन वॉल्श (ज्युनियर). 

ट्‌वेन्टी-20 संघ : 

किएरॉन पोलार्ड (कर्णधार), फॅबिन अलेन, ब्रॅंडन किंग, दिनेश रामदिन, शेल्डन कॉट्रेल, एविन लुईल, शेरफेन रुदरफर्ड, शिमरॉन हेटमेर, खेरी पेरी, लेंडल सिमन्स, जेसन होल्डर, हेडन वॉल्श (ज्युनियर), किमो पॉल, निकोलस पूरन, केसर्रिक विल्यम्स.


​ ​

संबंधित बातम्या