श्रीसंतच्या 'कमबॅकवर' केरळच्या प्रशिक्षकांचा 'स्टेटड्राइव्ह'

टीम ई-सकाळ
Monday, 6 July 2020

श्रीसंतच्या पुनरागमनाबाबत प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी श्रीसंत  केरळसाठीच नव्हे तर पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

स्पॉट फिक्सिंगप्रकरणात अडकल्यामुळे कारकिर्दीला ब्रेक लागलेल्या श्रीसंतला आता पुन्हा क्रिकेटच्या मैदानात सुसाट धावण्याचे वेध लागले आहेत. केरळच्या रणजी संघातून तो पुन्हा आपल्या खेळाला सुरुवात करण्याची चर्चा मागील काही दिवसांपासून रंगत आहे. भारतीय संघाचे प्रतिनिधीत्व केलेले आणि सध्याच्या घडीला केरळच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झालेल्या टिनू योहानन यांनीही श्रीसंतच्या कमबॅकचे संकेत दिले आहेत. क्रिडा पत्रकार साक्षी गुप्ता यांनी सकाळ टाइम्स इंग्रजी वेबसाइटसाठी घेतलेल्या खास मुलाखतीमध्ये केरळचे मुख्य प्रशिक्षक टिनू योहानन यांना श्रीसंतच्या पुनरागमनाबाबत प्रश्न विचारला होता. यावर त्यांनी श्रीसंत  केरळसाठीच नव्हे तर पुन्हा राष्ट्रीय संघात स्थान मिळवू शकतो, असा विश्वास व्यक्त केला.

सौरव गांगुलीकडूनही 'त्या' नियमाचा भंग?

टिनू योहानन म्हणाले की, रणजीच्या आगामी हंगामात श्रीसंत केरळकडून खेळावे अशी आमची इच्छा आहे. त्याला स्वत:ला सिद्ध करण्याची गरज नाही. त्याने आपली क्षमता दाखवून दिली आहे. क्षमतेच्या जोरावर पुन्हा मैदानात उतरण्यासाठी तो सज्ज आहे. आता तो फक्त सप्टेंबरची वाट पाहतोय. आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणानंतर श्रीसंतवर आजीवन बंदी घालण्यात आली होती. या प्रकरणात श्रीसंतने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली. त्यानंतर न्यायालयाने त्याच्यावरील बंदी हटवण्याचे निर्देश दिले होते. सप्टेंबरपासून त्याच्या क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सध्याच्या घडीला त्याच्या संघातील पुनरागमनाबाबत काही सांगू शकत नाही. पण सप्टेंबरनंतर त्याचा फिटनेस पाहून योग्य तो निर्णय घेण्यात येईल. क्रिकेटच्या मैदानात पुन्हा झोकात पुनरागमन करण्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे. मी त्याच्या संपर्कात असून तो राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याचे स्वप्न बाळगून आहे, असेही टिनू योहानन यांनी म्हटले आहे. 

जाहिरातदारांमध्येच निरुत्साह...काय होणार मग आयपीएलचे?

केरळच्या टिनू योहानन यांनी 2001 मध्ये मोहालीच्या मैदानात इंग्लंडविरुद्ध रंगलेल्या सामन्यातून भारतीय संघाकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यांच्यानंतर श्रीसंत आणि संजू सॅमसन या दोन केरळच्या गड्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले. पण त्यातील श्रीतंने एकट्यानेच कसोटी संघात स्थान मिळवले. यासंदर्भातही त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ते म्हणाले की खेळाडू आपल्या करियरकडे कशा पद्धतीने पाहतो यावर ते अवलंबून असते. केरळकडून प्रतिनिधीत्व केल्यानंतर आयपीएलमध्ये मिळणाऱ्या संधीवर काही समाधानी होतात. ही मानसिकता बाजूला ठेवून  मोठे ध्येय बाळगले तर केरळचे खेळाडूही निश्चित भारतीय कसोटी संघातही स्थान मिळवू शकतील, असे ते म्हणाले. 


​ ​

संबंधित बातम्या