Video : मनिष पांडेच्या लग्नातला युवीचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

वृत्तसंस्था
Wednesday, 4 December 2019

भरताचा माजी फलंदाज युवराजसिंग मात्र, या लग्नाला आवर्जून उपस्थित होता. त्याने आपल्या भन्नाट डान्सने सर्वांची मनंही जिंकली. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

मुंबई : भारताचा फलंदाज मनिष पांडे याचा नुकताच मुंबईत लग्नसोहळा पार पडला. या सोहळ्याला फक्त मोजकेच नातेवाईक आणि जवळच्या मित्रांना निमंत्रण देण्यात आले होते. भारतीय संघातील कोणताही खेळाडू या लग्नाला उपस्थित नव्हता. 

पृथ्वी शॉचे कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन

भरताचा माजी फलंदाज युवराजसिंग मात्र, या लग्नाला आवर्जून उपस्थित होता. त्याने आपल्या भन्नाट डान्सने सर्वांची मनंही जिंकली. त्याच्या या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vijay Bhatt (@vijaybhatt888) on

रविवारी मनिष पांडेच्या कर्नाटर संघाने सईद मुश्ताक अली ट्वेंटी20 करंडकाचे विजेतेपद पटकाविले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी तो आयुष्यातील एक नवी इनिंग सुरु करण्यास सज्ज झाला त्याने दोन डिसेंबरला दाक्षिणात्य अभिनेत्री अश्रिता शेट्टीशी लग्नगाठ बांधली.

IPL 2020 : अभी जोश बाकी है! मॅक्सवेल आयपीएलच्या लिलावात

गेल्या अनेक दिवसांपासून ते दोघं एकमेकांना डेट करत होते. मात्र, त्यांनी सर्वांपासून फार हुशारीने हे लपवून ठेवले होते. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील मालिकेला सहा डिसेंबरपासून सुरवात होणार आहे. यातील ट्वेंटी20 संघात मनिषला स्थान देण्यात आले आहे.  

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

About yesterday - and a big thankyou to everyone who were a part of this. Thankyou for your love and best wishes

A post shared by Manish Pandey  (@manishpandeyinsta) on


​ ​

संबंधित बातम्या