इंग्लंडमधला फेल होणारा कोहली परत आलाय! कसा आउट झालाय बघा

वृत्तसंस्था
Friday, 21 February 2020

वाईड जाणाऱ्या चेंडूवर फटका मारताना तो स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. आजच्या सामन्यात तो केवळ सात चेंडूचा सामना करु शकला आणि तो केवळ दोन धावा करुन बाद झाला.   

वेलिंग्टन : भारतीय संघ 2014मध्ये इंग्लंड दौऱ्यावर गेला असताना तो काळ विराट कोहलीसाठी किती कठीण होता हे प्रत्येक क्रिकेटप्रेमीला माहित आहे. न्यूझीलंडविरुद्धचा दौराही भारताच्या कर्णधारासाठी असाच काहीसा भयानक होऊ लागला आहे. आणि त्यामुळेच आता क्रिकेटप्रेमींना कोहलीचा इंग्लंडमधील काळ परत आला आहे असे वाटायला लागले आहे. 

आता खेळत होता अन् आता भारताच्या स्पिनरने केली निवृत्ती जाहीर

आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या कोहली न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात ज्याप्रकारे बाद झाला ते पाहता त्याचा आत्मविश्वास नक्कीच कमी झाल्याचे दिसत आहे. गेल्या नऊ डावांमध्ये (चार टी20, तीन एकदिवसीय सामने आणि एक कसोटी) कोहलीला केवळ एकच अर्धशतक करत आले आहे.  

कानामागून आला अन् तिखट झाला; पदार्पणात जेमीसनने दाखवली भारतीयांना जागा

2014 च्या इंग्लंड दौऱ्यात कोहली सर्वात खराब कामगिरी करणारा खेळाडू ठरला. कसोटी आणि एकदिवसीय दोन्ही प्रकारात त्याला मैदानावर साधे टिकून राहण्यातही अपयश आले. इंग्लंड दौऱ्यानंतर कोहली सर्वात पहिली कोणती गोष्ट शिकली असेल तर ती म्हणजे चेंडू सोडून देणे. सुरवातीपासूनच आक्रमक प्रवृत्ती असलेल्या कोहलीसाठी चेंडू न खेळता सोडून देण्याची कला अवगत करणे सर्वात कठीण होते. फलकावर धावा लावणे गरजेचे असतेच मात्र फलंदाजाची फिरकी घेणाऱ्या चेंडूचा मान राखून तो सोडून देण्यास कोहली शिकला. मात्र, आजच्या सामन्यात तो ज्याप्रकारे बाद झाला ते पाहून सर्वांनाच 2014च्या त्या खराब दिवसांची आठवण झाली आणि मनात भिती दाटली.

100 टेस्ट, 100 वाईन बाटल्या! याची मजा आहे राव

वाईड जाणाऱ्या चेंडूवर फटका मारताना तो स्लिपमध्ये झेल देऊन बाद झाला. आजच्या सामन्यात तो केवळ सात चेंडूचा सामना करु शकला आणि तो केवळ दोन धावा करुन बाद झाला.   


​ ​

संबंधित बातम्या