लग्न कधी करणार विचारल्यावर या मुलीने थेट युवीवर फोडलं खापर

वृत्तसंस्था
Tuesday, 13 August 2019

भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत परदेशातील टेव्ंटी20 लीग खेळण्यास सुरवात केली. तो नुकताच कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी20 लीगमध्ये खेळला. या लीगदरम्यान युवीवर चक्क एका महिलेने खापर फोडले आहे

टोरंटो : भारतीय संघाचा माजी फलंदाज युवराज सिंगने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत परदेशातील टेव्ंटी20 लीग खेळण्यास सुरवात केली. तो नुकताच कॅनडात झालेल्या ग्लोबल ट्वेंटी20 लीगमध्ये खेळला. या लीगदरम्यान युवीवर चक्क एका महिलेने खापर फोडले आहे. 

ग्लोबल ट्वेंटी-20 लीगच्या एका सामन्यानंतर ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू बेन कटींगची मुलाखत सुरू होती आणि ती मुलाखत त्याची होणारी पत्नी एरिन हॉलंड घेत होती. त्यावेळी युवीनं घुसखोरी करताना त्या दोघांना तुम्ही लग्न कधी करताय, असा सवाल केला होता. युवीचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता.

आता वेळ निघून चालली आहे, लवकरात लवकर लग्न करा, असे म्हणत युवीने मुलाखतीत एन्ट्री घेतली होती. त्यानंतर स्टेडियममधील एका चाहत्याने तिच्यासाठी हातात फलक घेऊन उभा राहिला. ''ग्लोबल ट्वेंटी-20 लीगची अंतिम फेरी उद्या होणार आहे, परंतु तुम्ही लग्न कधी करणार?'' असा प्रश्न त्यावर विचारण्यात आला होता. 

संबंधित बातम्या