आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा - वसीम अक्रम

टीम ई-सकाळ
Friday, 31 July 2020

आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने म्हटले आहे. 

भारतातील चाहत्यांपासून संपूर्ण जगभर इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) क्रिकेट स्पर्धेचे अनेकजण चाहते आहेत. 2008 मध्ये सुरु झालेल्या या स्पर्धेचे दरवर्षी  सर्व क्रिकेट प्रेमी आतुरतेने वाट पाहतात. तसेच भारतातील क्रिकेटपटूंसोबत इतर देशातील खेळाडू देखील या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे भारतीय क्रिकेट क्षेत्राला आयपीएलच्या स्पर्धेमुळे सुवर्ण दिवस पाहायला मिळाले आहेत. त्यानंतर आता आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी गोलंदाज वसीम अक्रमने म्हटले आहे. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

   
आयपीएल स्पर्धेने 2008 मध्ये फ्रेंचायझी लीगच्या स्थापनेपासून ते मनोरंजन, नव्या खेळाडूंची जडण-घडण व व्यावसायिकदृष्ट्या सर्वच पातळीवर मोठे यश मिळवले आहे. त्यामुळेच आयपीएल ही जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असल्याचे वसीम अक्रमने म्हटले आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने माजी खेळाडू तन्वीर अहमद याच्याशी संवाद साधताना, आयपीएलच्या माध्यमातून मागील पाच-सहा वर्षात मोठी आर्थिक उभारणी करण्यात यशस्वी झाल्यामुळेच ही स्पर्धा सगळ्यात मोठी असल्याचे सांगितले. आयपीएल स्पर्धेत खेळाडू खरेदी करण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते आणि यातूनच मिळालेला नफा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) स्थानिक क्रिकेट मध्ये गुंतवत असल्यामुळे भारतात क्रिकेटला चांगले दिवस आल्याचे वसीम अक्रमने नमूद केले. 

याशिवाय, आयपीएल मधील प्रत्येक संघात वैयक्तिक प्रशिक्षक असल्यामुळे या गोष्टीचा खेळाडूंना मोठा फायदा होत असल्याचे मत वसीम अक्रमने व्यक्त केले. आणि याच गोष्टीमुळे आयपीएल मधील सहभागी सर्वच खेळाडू मोठ्या आत्मविश्वासाने खेळी करत असल्याचे अक्रमने सांगितले. सुरवातीला काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदाची धुरा वसीम अक्रमने सांभाळली होती. त्यावेळेसच 2012 आणि 2014 मध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.     

यू.एस ओपन मधून जागतिक टेनिसपटू एश्लीग बार्टीची माघार  

दरम्यान, यंदाची ऑस्ट्रेलियातील टी-20 विश्वचषक स्पर्धा रद्द झाल्यामुळे आयपीएलच्या आयोजनाचा मार्ग खुला झाला. त्यामुळे बीसीसीआयने आयपीएलच्या संयोजनाची एकेक प्रक्रिया सुरू करण्यास प्रारंभ केली आहे. यंदाचा आयपीएल स्पर्धेचा तेरावा हंगाम युएईमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.                
 


​ ​

संबंधित बातम्या