आयसीसीच्या 'त्या' निर्णयामुळे गोलंदाज रोबोट बनणार

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 11 June 2020

कोरोनाच्या संकटामुळे थांबलेल्या क्रीडा विश्वाला पुन्हा गती देण्यासाठी जगभरात आता सगळीकडेच प्रयत्न सुरु झाले आहेत. त्यातच कोरोनाचा धोका संपूर्णपणे गेला नसल्याने, खबरदारी घेतच खेळाचे नियोजन सुरु झाले आहे. त्यामुळे अनेक क्रीडा संघटनांनी खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करत, स्पर्धांना परवानगी देण्याचे धोरण स्वीकारले आहे. काल मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) देखील क्रिकेट सामन्यांच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामध्ये चेंडूला चमकण्यासाठी लाळ वापरण्यावर बंदी आणि सामन्यांसाठी पंचांच्या नियुक्तीसंदर्भात बदल करण्यात आले होते. आयसीसीने सामन्यांच्या नियमात केलेल्या या बदलावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने जाहीर टीका केली आहे. आयसीसीच्या या निर्णयामुळे गोलंदाज हे रोबोट बनणार असल्याचे वसीम अक्रमने म्हटले आहे. 
       
गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कोरोना संकटामुळे क्रिकेटजगत पूर्णतः थांबले होते. त्यानंतर पुन्हा क्रिकेटजगतात सामन्यांचे आयोजन करण्यास  आहे. मात्र    
कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) खेळाच्या नियमात तात्पुरते बदल करण्याचा निर्णय घेतला काळ मंगळवारी होता.   
सामन्यात चेंडूची चमक टिकून रहावी आणि चेंडूला स्विंग करण्यासाठी खेळाडू आपल्या लाळेचा वापर करत, मात्र आयसीसीने यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यामुळे आयसीसीच्या या निर्णयावर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू व वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने असहमती दर्शवत, यामुळे गोलंदाज हे रोबोट बनणार असल्याचे म्हटले आहे.चेंडूची चमक टिकून राहण्यासाठी आणि चेंडूला स्विंग करण्यासाठी लाळेचा वापर न करता, खेळाडूंनी घामाचा अतिरिक्त वापर केल्यास चेंडू ओला होण्याची शक्यता वसीम अक्रमने वर्तविली आहे. यासोबतच वसीम अक्रमने चेंडू स्विंग न झाल्यामुळे गोलंदाज फक्त मैदानावर येतील, चेंडू टाकतील आणि निघून जातील, असे चित्र सामन्यात उभे राहणार असल्याचे म्हटले आहे.               

दरम्यान, याआधी क्रिकेट सामन्यात सर्वांच्याच सुरक्षितेसाठी आयसीसीच्या वैद्यकीय सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. पीटर हार्कोर्ट यांनी दिलेल्या अहवालानुसार, चेंडूला लावण्यात येणाऱ्या थुंकीमुळे करोना विषाणू संसर्गाच्या वाढीबाबत जोखीम असल्याचे म्हंटले होते. त्यावर उपाय म्हणून तात्पुरते बदल करण्यासंदर्भात अनिल कुंबळे याच्या अध्यक्षतेखाली क्रिकेट समितीने एकमताने काही बदल आयसीसीकडे प्रस्तावित केले होते. त्यानुसार चेंडूला लाळ लावण्यावर बंदी तसेच सामन्यात पंच म्हणून यजमान देशाच्याच पंचाची नियुक्ती करण्यासंदर्भात आणि सामना चालू असताना इतर खेळाप्रमाणे क्रिकेट मध्ये देखील एका खेळाडूच्या बदल्यात दुसरा बदली खेळाडू मैदानावर उतरवण्यास परवानगी देण्याचा निर्णय आयसीसीकडून घेण्यात आला आहे.

​ ​

संबंधित बातम्या