रोहित शर्माच्या या टीमने जिंकला 754 धावांनी सामना; सर्व प्रतिस्पर्धी फलंदाज शून्यावर बाद

वृत्तसंस्था
Thursday, 21 November 2019

मीत मयेकरच्या तडाखेबाज त्रिशतकामुळे बोरिवलीच्या शाळेने 4 बाद 761 धावांचा हिमालय उभारल्याची चर्चा संपण्यापूर्वीच चिल्ड्रेन वेलफेअरचा डाव 6 षटकांत 7 धावांत संपला होता. अर्थातच दोन संघातील फरक झाला होता तब्बल 754 धावांचा. अर्थातच हा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्‍वविक्रमी विजयच आहे. या विवेकानंद शाळेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा शिकला आहे. त्याने क्रिकेट खेळायला विवेकानंद शाळेतूनच सुरवात केली. 

मुंबई : क्रिकेटमध्ये कोणी स्वप्नातही अपेक्षित धरलेले नसते तेच घडते. याचाच अनुभव हॅरिस ढाल क्रिकेट स्पर्धेतील बोरिवलीचे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूल आणि अंधेरीचे चिल्ड्रेन वेलफेअर यांच्यातील लढतीत आला. मीत मयेकरच्या तडाखेबाज त्रिशतकामुळे बोरिवलीच्या शाळेने 4 बाद 761 धावांचा हिमालय उभारल्याची चर्चा संपण्यापूर्वीच चिल्ड्रेन वेलफेअरचा डाव 6 षटकांत 7 धावांत संपला होता. अर्थातच दोन संघातील फरक झाला होता तब्बल 754 धावांचा. अर्थातच हा एकदिवसीय क्रिकेटमधील विश्‍वविक्रमी विजयच आहे. 

AUSvsPAK : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव पुन्हा उघड

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 290 धावांनी विजय न्यूझीलंडने मिळवला आहे. त्यांनी ही कामगिरी आयर्लंडविरुद्ध करताना 402 धावा केल्या होत्या. त्यापेक्षा कमालीचा मोठा फरक या सामन्यात दिसला. मीत मयेकरने 134 चेंडूंत 56 चौकार आणि 7 षटकारांची आतषबाजी केली. त्याला कृष्णा पारतेच्या 95 धावांची साथ लाभली आणि बोरिवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनलने 45 षटकांत 4 बाद 761 धावांचा हिमालय उभारला. हा धावांचा गड सर करणे प्रतिस्पर्ध्यांना अशक्‍य असल्याचीच जाणीव सर्वांनाच होती; पण आलोक पाल आणि वरद वझेने जणू मीत मयकेरचे फलंदाजीतील वर्चस्व झाकोळणारी कामगिरी केली. मध्यमगती गोलंदाज आलोकने तीन धावात सहा फलंदाज बाद केले, तर वरदने तीन धावात दोघांना. त्यामुळे चिल्ड्रेन वेलफेअरचा डाव सात धावातच संपला. 

या सामन्यात किती विक्रम घडले हे मलाच सांगता येणार नाही. आता हेच पाहा, आम्ही सात धावांत डाव संपवला; पण त्यांच्या एकाही फलंदाजास भोपळा फोडता आला नाही. त्यांच्या सात धावा झाल्या त्या एक धाव बायची होती, तर सहा धावा वाईडच्या होत्या. आम्ही एवढा झटपट विजय कधीच अपेक्षित केला नव्हता; असे स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मार्गदर्शक दिनेश लाड यांनी सांगितले. हा आझादवरील न्यू एरा मैदानावर झालेला सामना संपवून आमचे खेळाडू दुपारी 2 पर्यंत घरीही पोचले होते, असेही त्यांनी सांगितले.

AUSvsPAK : बाबर आझमने तोडला विश्वास, पाकची कांगारुंसमोर दाणादाण

हा एवढा मोठा विजय स्वप्नातही मिळेल असे वाटले नव्हते. आम्ही ही लढत सहज जिंकणार याची खात्री होती; पण सामना एवढा एकतर्फी होईल, याची कधीही अपेक्षा केली नव्हती. हा एक प्रकारचा आमच्यासाठी धक्काच होता. 
- दिनेश लाड, स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलचे मार्गदर्शक 

या विवेकानंद शाळेत भारताचा उपकर्णधार रोहित शर्मा शिकला आहे. त्याने क्रिकेट खेळायला विवेकानंद शाळेतूनच सुरवात केली. 

हैदराबादमधील शालेय विक्रम मोडीत 
हैदराबादमधील शालेय स्पर्धेत 2006 मध्ये सेंट पीटर्स हायस्कूलने सेंट फिलिप्स हायस्कूलला 700 धावांनी पराजित केले होते. त्या वेळी सेंट पीटर्सने 721 धावा केल्यावर सेंट फिलीपचा डाव 21 धावात संपवला होता. हैदराबाद क्रिकेट संघटनेच्या आंतरशालेय स्पर्धेतील हा सामना 40 षटकांचा होता. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सेंट पीटर्सचा हा 700 धावांचा विजय आत्तापर्यंतचा सर्वांत मोठा विजय होता, असे आंतरराष्ट्रीय सांख्यिकीतज्ज्ञ मोहनदास मेमन यांनी सांगितले. त्यांनी या सामन्यातच मनोज कुमार - मोहम्मद शाहबाजने 721 धावांची नाबाद विक्रमी सलामी देताना सचिन तेंडुलकर - विनोद कांबळीचा नाबाद 664 धावांचा विक्रम मोडला होता, याची आठवण करून दिली. 
 


​ ​

संबंधित बातम्या