रोहित ODIमध्ये भारी खेळतो मग कसोटीतच काय फेरा येतो? : व्हिव्ह रिचर्डस

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत आपली छाप पाडता आली नाही. त्याच्या खेळातील हीच अनिश्चितता व्हिव्ह रिचर्डस यांना विचित्र वाटते असे स्पष्ट करत त्यांनी आपले आश्चर्य व्यक्त केले आहे. 

अॅंटीग्वा : भारताचा सलामीवीर रोहित शर्मा हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला आतापर्यंत आपली छाप पाडता आली नाही. त्याच्या खेळातील हीच अनिश्चितता व्हिव्ह रिचर्डस यांना विचित्र वाटते असे स्पष्ट करत त्यांनी आपले आश्चर्य व्यक्त केले आहे. 

''मी त्याला काल भेटलो आणि त्याला सांगितले की ती तुझी एकदिवसीय क्रिकेटमधील 25 शतकं आहेत ना ती बचावात्मक खेळून झाली आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये मैदानावर खूप रिकामी जागा असते आणि झेल घेण्यासाठी खूप कमी लोकं असतात त्यामुळे तुझी सहज शतकं झाली आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये झेल पकडण्यासाठी खूप खेळाडू असतात त्यामुळे तु एकदिवसीय क्रिकेटमधील आक्रमकता कसोटी क्रिकेटमध्येही दाखविण्यास सुरवात केली तर तू कसोटीमध्येही यशस्वी होशील,''

''त्याचे रेकॉर्ड विचित्र आहेत. त्याची विचारसरणी मला कळतं नाही. तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये असेल भारी पण कसोटी क्रिकेटमध्ये त्याचे रेकॉर्ड अजिबात चांगले नाही. त्याला आणखी संधी दिली जात आहे, त्यामुळे त्याला आता पुन्हा नव्याने सुरवात करायला लागणार आहे," असेही त्यांनी सांगितले. 


​ ​

संबंधित बातम्या