महाराष्ट्र रणजी संघात विशांत मोरेची निवड 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 9 December 2019

महाराष्ट्र 22 वर्षाखालील संघाचे कर्णधारपद देखील भुषविले आहे. तसेच सलग दोन वर्षे 25 वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती. विशांत हा विकेट किपर फलदांज असून याची झोनल क्रिकेट अकॅडमीमध्ये विकेट किपर स्पेशालिस्ट कॅम्पसाठी निवड झाली होती.

कोल्हापूर - विशांत मोरे याची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात रणजी स्पर्धेसाठी निवड झाली. विशांत मोरे हा कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा खेळाडू आहे. यापुर्वी 2015 ते 2017 या दरम्यान महाराष्ट्र रणजी संघात निवड झाली होती. विशांत मोरेने यापुर्वी महाराष्ट्र 14, 15, 17, 19 वर्षाखालील संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे.

महाराष्ट्र 22 वर्षाखालील संघाचे कर्णधारपद देखील भुषविले आहे. तसेच सलग दोन वर्षे 25 वर्षाखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती. विशांत हा विकेट किपर फलदांज असून याची झोनल क्रिकेट अकॅडमीमध्ये विकेट किपर स्पेशालिस्ट कॅम्पसाठी निवड झाली होती. सोबतच नॅशनल किक्रेट अकॅडमीमध्ये देखील सराव केला आहे. 

हेही वाचा - जाणून घ्या शिवाजी विद्यापीठ स्थापनेचा इतिहास

महाराष्टाचा संघाचा 'क' गटात समावेश

महाराष्ट्र संघाचा क गटात समावेश असुन ग गटात आसाम, उत्तराखंड, छत्तीसगड, हरियाणा, जम्मु काश्‍मिर, झारखंड, ओडीसा, सर्व्हिसेस व त्रिपुरा हे राज्य संघ आहेत. महाराष्ट्राचा पहिला सामना हरियाणा विरूध्द रोहटक येथे होणार आहे. दुसरा सामना जम्मु काश्‍मिर, तिसरा सामना छत्तीसगड, चौथा सामना सव्हिसेस, पाचवा सामना झारखंड, सहावा सामना आसाम, सातवा सामना त्रिपुरा, आठवा सामना ओडिसा व शेवटचा नववा सामना उत्तराखंड संघाशी होणार आहे.  

हेही वाचा - सत्यभामाची जुन्या सायकलने राष्ट्रीय स्पर्धेसाठी तयारी 


​ ​

संबंधित बातम्या