परदेशातील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी तशी कामगिरी करावी लागते : सेहवाग 

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिकाही गमावली. या पराभवानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने परदेश दौऱ्यातील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी संघाला तशी कामगिरी करावी लागते, असे म्हणत भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे.  

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यातील पराभवासह भारताने पाच सामन्यांची कसोटी मालिकाही गमावली. या पराभवानंतर भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागने परदेश दौऱ्यातील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी संघाला तशी कामगिरी करावी लागते, असे म्हणत भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्रींवर निशाणा साधला आहे.  

चौथ्या सामन्यातील पराभवानंतर एका वाहिनीशी बोलताना सेहवाग म्हणाला, ''परदेश दौऱ्यातील सर्वोत्तम संघ बनण्यासाठी संघाने मैदानावर चांगली कामगिरी करणे गरजेचे आहे. नुसते ड्रेसिंगरुममध्ये बसून चर्चा करुन आपण सर्वोत्तम संघ बनू शकत नाही. कोणी कितीही बोलले तरी मैदानावर उत्तम कामगिरी होत नाही तोपर्यंत संघ सर्वोत्तम होऊ शकत नाही.''

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील विजयानंतर रवी शास्त्री यांनी भारत मालिकेत पुनरागमन करण्याची विश्वास व्यक्त केला होता. तसेच, भारत परदेश दौऱ्यातील सर्वौत्तम संघ बनू शकतो असे मत व्यक्त केले होते. त्याच्या याच वक्तव्यावर सेहवागने टिका केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या