धक्कादायक! सावंतवाडीच्या फलंदाजाचा अर्धशतक ठोकल्यानंतर झाला मृत्यू

वृत्तसंस्था
Monday, 18 November 2019

हैदराबादच्या मारडपल्ली स्पोर्टींग क्लबच्या वीरेंद्र नाईक याने खेळपट्टीवर शानदार अर्धशतक झळकाविले. मात्र, त्यानंतर तो बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये जाताच त्याचा मृत्यू झाला. 

हैदराबाद : क्रिकेटच्या खेळपट्टीवर अनेक अपघात होत राहतात. अनेकवेळा अशा अपघातांमध्ये खेळाडूंचा मृत्यूही होतो. हैदराबादमध्ये एका क्लबच्या सामन्यामध्ये क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. मात्र, त्याचा मृत्यू अपघातामुळे झाला नसल्याचे नंतर निदर्शनास आले. रविवारी एकदिवसीय लीग दरम्यान ही घटना घडली. या लीग दरम्यान 41 वर्षीय वीरेंद्र नाईकचा मृत्यू झाला. 

'...तर तुझाही विनोद कांबळी होईल'; पृथ्वी शॉ झाला ट्रोल!

हैदराबादच्या मारडपल्ली स्पोर्टींग क्लबच्या वीरेंद्र नाईक याने खेळपट्टीवर शानदार अर्धशतक झळकाविले. मात्र, त्यानंतर तो बाद झाला आणि पॅव्हेलियनमध्ये जाताच त्याचा मृत्यू झाला. 

गौतम गंभीर बेपत्ता

हृदयविकाराच्या झटक्याने झाला मृत्यू
एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार त्याला हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. वीरेंद्रचा भाऊ अविनाश याने पोलिसांना सांगितले की तो गेल्या अनेक दिवसांपासून छातीच्या आजारासाठी उपचार घेत आहे.  वीरेंद्र नाईक मुळचा सावंतवाडीचा असल्याने शवविच्छेदनानंतर त्याचे पार्थिव सावंतवाडीला नेण्यात येईल आणि तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. 


​ ​

संबंधित बातम्या