वीरेंद्र सेहवागने शेअर केला टोळधाडीचा व्हिडिओ 

टीम ई-सकाळ
Saturday, 27 June 2020

गेल्या काही दिवसांपासून देशाच्या विविध भागात टोळधाडीने आक्रमण केल्याचे चित्र पाहायला मिळत होते. या टोळधाडीने राजस्थान सहित इतर राज्यातील पिकांची नासधूस केल्यानंतर, आज गुरूग्रामच्या काही भागात शिरकाव केल्याचे समजते. भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावरील ट्विटर आणि इंस्टाग्राम वर या टोळधाडीचा व्हिडिओ शेअर केला आहे. 

शारीरिक तंदरुस्तीसाठी मोहम्मद शमीने वापरला 'हा' अनोखा फंडा 

कोरोनाच्या खबरदारीसाठी म्हणून लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे अधिकतर सर्वच खेळाडू घरी आहेत. त्यामुळे काही खेळाडू आपला अधिकतर वेळ सोशल मीडियावर घालवत आहेत. आणि अशातच मध्य प्रदेश, राजस्थान आणि त्यानंतर हरयाणामध्ये गेल्यानंतर या टोळधाडीने गुरुग्राम मध्ये प्रवेश केला आहे. आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर विरेंद्र सेहवागचे घर या क्षेत्रातच असल्याने, त्याने या टोळधाडीचा व्हिडिओ पोस्ट करत, टोळधाडीचा हल्ला झाल्याचे पोस्टमध्ये लिहिले आहे.              

राजस्थान व हरयाणा राज्यात टोळधाडीने पिकांचे चांगलेच नुकसान केले आहे. त्यानंतर या टोळधाडीचा निश्चित मार्ग समजू शकलेला नाही. मात्र गुरुग्राम मध्ये या टोळधाडीने प्रवेश केल्यानंतर दिल्लीतील राज्य सरकारने तातडीने बैठक घेत, या समस्येवर उपाययोजना आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी म्हटले आहे.

कोरोनामुळे आता टेनिस जगतातील 'ही' स्पर्धा स्थगित 

दरम्यान, यापूर्वी कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाउन मध्ये परप्रांतीय कामगारांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले होते. त्यावेळेस विरेंद्र सेहवागने मजदुरांना मदत केली होती. परप्रांतीय कामगारांसाठी खाण्याचे पदार्थ बनवतानाचे व्हिडिओ विरेंद्र सेहवागने सोशल मीडियावर अपलोड केले होते.                
 
​ ​

संबंधित बातम्या