ऑस्ट्रेलिया दौरा आला, आता तरी मेहनत करा: सेहवाग

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

इंग्लंडमधील भारतीय संघाच्या लाजीरवाण्या पराभवानंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर जोरदार टीका करताना आता ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचे आठवण करून दिली आहे.

नवी दिल्ली : इंग्लंडमधील भारतीय संघाच्या लाजीरवाण्या पराभवानंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने भारतीय फलंदाजांच्या कामगिरीवर जोरदार टीका करताना आता ऑस्ट्रेलिया दौरा असल्याचे आठवण करून दिली आहे.

सेहवागने भारतीय संघाच्या कामगिरीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संघाच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याने भारताचा पराभव झाल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी त्याने राहुल व पंत यांच्यासह गोलंदाजांचे कौतुक केले. संघातील अन्य खेळाडूंचे कान टोचताना सेहवागने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्याची आठवण करून देताना म्हटले आहे, की आता ऑस्ट्रेलिया दौरा असून, चांगल्या कामगिरीसाठी मेहनत घेण्याची गरज आहे.

लोकेश राहुल आणि रिषभ पंतनी बहारदार शतके ठोकत भारतीय संघाचा पाचव्या कसोटीतील पराभव टाळायचा जिवापाड प्रयत्न केला. अँडरसननने शमीला बाद करून भारताचा दुसरा डाव 345 धावांवर संपवला आणि इंग्लंडने ओव्हल कसोटी सामना 118 धावांनी जिंकला. इंग्लंडने मालिका 4-1 फरकाने जिंकली. या पराभवानंतर भारतीय संघाच्या कामगिरीवर टीका होत आहे.


​ ​

संबंधित बातम्या