सचिन आणि विराटमध्ये तुलना नाही; सेहवाग

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

सचिनशी तुलना करण्यासाठी कोहलीला अजून बरच काही करावे लागणार आहे. या दोघांमध्ये तुलना करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, की हे दोघेही आपापल्या काळातील फलंदाजीतील दिग्गज आहेत. त्यामुळे सचिन आणि कोहलीमध्ये तुलना करावी असे मला वाटत नाही.

नवी दिल्ली : इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत जबरदस्त फॉर्ममध्ये असलेला भारताचा कर्णधार विराट कोहली याची मी कधीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरसोबत तुलना नसल्याचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने स्पष्ट केले आहे.

विराटने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात कसोटी कारकिर्दीतील 23 वे शतक झळकाविले होते. सचिन तेंडुलकरची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण 100 शतके आहेत. सचिनचा हा विक्रम विराटच मोडू शकतो, असे अनेकांचे मत आहे. 

याविषयी बोलताना सेहवाग म्हणाला, की सचिनशी तुलना करण्यासाठी कोहलीला अजून बरच काही करावे लागणार आहे. या दोघांमध्ये तुलना करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे, की हे दोघेही आपापल्या काळातील फलंदाजीतील दिग्गज आहेत. त्यामुळे सचिन आणि कोहलीमध्ये तुलना करावी असे मला वाटत नाही. सचिनने केलेल्या 100 शतकांचा विक्रम मोडण्यासाठी अनेक क्रिकेटपटू झगडत आहेत. विराटने हा विक्रम मोडल्यानंतर आपण त्याविषयी बोलू. त्यामुळे त्याला आता आणखी काही करू द्या.


​ ​

संबंधित बातम्या