Asia Cup 2018 : आता भारताची खरी ताकद कळेल..

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाला आपली खरी ताकद दाखवण्याची संधी आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. 

दुबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघाला आपली खरी ताकद दाखवण्याची संधी आहे, असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी व्यक्त केले आहे. 

''कोणत्याही करंडकात तुम्ही एका खेळाडूवर अवलंबून राहणार असाल तर तु्म्ही करंडक जिंकू शकत नाही. मागील सात आठ वर्षांत कोहली भारतीय संघाचा आधारस्तंभ बनला आहे. कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघाला स्वत:ची ताकद सिद्ध करण्याची संधी मिळेल. भारतीय संघाने कोहलीच्या अनुपस्थितीत चांगली कामगिरी केली तर त्यांची ताकद अजून वाढेल,'' असे मत भारताचे माजी कर्णधार कपिल दिव यांनी व्यक्त केले.

भारताचा कर्णधार विराट कोहली सध्या सुरु असलेल्या इंग्लंड दौऱ्यानंतर विश्रांती घेणार आहे. 15 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या आशिया करंडकात कोहलीऐवजी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धूरा रोहित शर्माकडे सोपविण्यात आली आहे.

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पराभव स्वीकारावा लागला तरी आशिया करंडकमध्ये भारतीय संघ उत्तम कामगिरी करेल असा विश्वास कपिल देव यांनी व्यक्त केला. ''कसोटी क्रिकेटमधून मर्यांदित षटकांत पुन्ही आल्यावर भारतीय संघ नक्की चांगली कामगिरी करेल. माझ्यामते भारतीय संघ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये नेहमीच वरचढ राहिला आहे,'' असे कपिल देव यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या