पाक क्रिकेटर म्हणाला, कोहली एकटा 11 गड्यांवर भारी ठरतो

टीम ई-सकाळ
Saturday, 13 June 2020

भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर्सला देखील त्याच्या खेळीबाबत कोणतीही शंका वाटत नाही. 

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने क्रिकेट जगतात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. कर्णधार म्हणून त्याची कसोटीपणाला लागली असली तरी वैयक्तिक खेळीत त्याला सध्याच्या घडीला तोड नाही. भारतीय संघाचा कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटर्सला देखील त्याच्या खेळीबाबत कोणतीही शंका वाटत नाही. माजी क्रिकेटर्स सकलेन मुश्ताक यांच्या एका वक्तव्याने पुन्हा एकदा कोहलीच्या 'विराट' खेळीचे पाकिस्तानी क्रिकेटमध्ये चर्चा असल्याचे दिसून आले आहे. 

धोनीसारखं मला कधीच जमलं नाही : राहुल द्रविड

पाकिस्तानचे माजी क्रिकेटर सकलेन मुश्ताक यांनी विराट कोहली संदर्भात मोठं विधान केले आहे. जेव्हा मी इंग्लंडच्या प्रशिक्षकपदी होतो त्यावेळी मी गोलंदाजांना देताना विराट कोहली एकटा नाही तर तो 11 गड्यांच्या बरोबरीचा आहे, असा सल्ला द्यायचो असे म्हटले आहे. आदिल रशिद आणि मोईन अली यांना गोलंदाजीच्या टिप्स देताना ते कोहलीच्या 'विराट' खेळीचे वर्णन या शब्दांत करायचे.  सकलेन मुश्ताक 2019 मध्ये इंग्लंडमध्ये रंगलेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी इंग्लंड संघासोबत होते. इंग्लंडच्या ताफ्यातील  फिरकीपटूंना मार्गदर्शन करण्याची जबादारी त्यांच्याकडे होती. मोईन खान आणि आदिल रशिद यांनी विराटला प्रत्येकी  6-6 वेळा बाद केले आहे.  

IPL बाबत दादा ठाम; आर्थिक संकटावर मात करण्यासाठी असा असू शकेल 'गेम_प्लॅन'

निखिल नाजसोबतच्या इन्स्टाग्राम लाइव्हच्या कार्यक्रमात शकलेन मुस्ताक यांनी विराटबाबतचा किस्सा शेअर केला. शकलेन मुश्ताक म्हणाले की, मी नेहमी गोलंदाजांना सांगायचो की विराट एकटा नाही तर तो 11 खेळाडूंच्या बरोबरीचा आहे. त्याची विकेट म्हणजे भारतीय संघाची विकेट असे मी गोलंदाजांना सांगायचो. कोणत्याही फिरकीपटूविरुद्ध खेळताना विराट कोहली डगमगत नाही.  लेफ्ट ऑर्मर असो, ऑफ स्पिनर असो किंवा लेग स्पिनर असो वेगवेगल्या प्रकारने फिरकी फेकणाऱ्यांची गिरकी घेण्यात तो पटाईत आहे, असेही मुश्ताक यांनी मान्य केले. लाखो लोक त्याच्याकडून अपेक्षा लावून आहेत. त्याचा खेळ पाहत आहेत. त्यामुळे दबाव त्याच्यावर आहे तुमच्यावर नाही, अशा शब्दात गोलंदाजांना प्रोत्साहित करायचो असेही त्यांनी सांगितले. लेग स्पिनर आदिल रशीदने 2018 मध्ये हेडिंग्ले वनडे सामन्यात विराट कोहलीला ज्या चेंडूवर बाद केले होते त्या चेंडूची चांगलीच चर्चा रंगली होती. चेंडू लेग स्टम्पवर टाकत रशीदने विराटची ऑफ स्टम्प टिपली होती. या चेंडूला सकलेनने 'विराट वाला गेंद' असे नाव दिले होते.  
 


​ ​

संबंधित बातम्या