तिसऱ्या कसोटीपर्यंत मी फीट असेन : विराट कोहली

वृत्तसंस्था
Monday, 13 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत चमक आल्याने त्याला खेळाताना श्वास घेणेही कठीण जात असल्याचे निर्दशनास आले. मात्र ही दुखापत गंभार नसून तिसऱया कसोटी सामन्यापर्यंत मी पूर्णपणे तंदुरुस्त असेल अशी ग्वाही विराट कोहलीने दिली आहे. 

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला एक डाव आणि 159 धावांनी अत्यंत मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. सामन्याच्या दुसऱ्या डावात कर्णधार विराट कोहलीच्या पाठीत चमक आल्याने त्याला खेळाताना श्वास घेणेही कठीण जात असल्याचे निर्दशनास आले. मात्र ही दुखापत गंभार नसून तिसऱया कसोटी सामन्यापर्यंत मी पूर्णपणे तंदुरुस्त असेल अशी ग्वाही विराट कोहलीने दिली आहे. 

दुसऱ्या डावात कोहलीने 27 चेंडूमध्ये 17 धावा केल्या आणि तो स्टुअर्ट ब्रॉडच्या जाळ्यात अडकला. त्याच्या दुखापतीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ''कामाचा ताण आणि सततच्या क्रिकेट खेळण्यामुळे ही पाठीची दुखापत पुन्हा पुन्हा डोकं वर काढत आहे. तिसऱ्या कसोटी सामन्याला अजून पाच दिवसाचा कालावधी आहे. थोड्याश्या उपचारानंतर मी पूर्णपणे तंदुरुस्त होईल याची मला खात्री आहे.'' 

दुसऱ्या कसोटी सामन्यातही अॅंडरसन आणि ब्रॉड यांच्या स्वींगसमोर भारतीय फलंदाजी पत्त्याच्या घराप्रमाणे सहज कोसळली. ''आम्ही ज्या प्रमाणे खेळ केला त्याबद्दल मी मनापासून नाराज आहे. परंती इंग्लंडच्या संघाला सर्व श्रेय जाते. त्यांनी सर्वोत्तम खेळ केला. जेव्हा एकादा संघ अशी कामगिरी करतो तेव्हा विजय मिळवणे हा त्यांचा हक्क असतो.'' असे मत कोहलीने व्यक्त केले. 

इंग्लंडमधील सतत बदलणाऱ्या वातावरणाबद्दल बोलताना तो म्हणाला, ''आम्ही या सर्व गोष्टींचा विचार करणे रास्त नाही. आम्हाला या परिस्थितीचा सामना करणे आवश्यक आहे.''

संबंधित बातम्या