मैदनाबाहेर असूनही स्मिथ कोहलीवर भारी

वृत्तसंस्था
Tuesday, 14 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान गमवावे लागले आहे.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने केलेल्या खराब कामगिरीमुळे त्याला जागतिक क्रमवारीतील पहिले स्थान गमवावे लागले आहे. चेंडू कुरतडल्याप्रकरणी 12 महिने बंदी असलेला ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ याने पुन्हा पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे.  

मार्चमध्ये दश्रिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यात स्मिथने चेंडू कुरतडल्याने त्याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने एक वर्षाची बंदी घातली आहे. भारताचा कर्णधार कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात दोन्ही डावांत एकूण 200 धावा केल्या. मात्र दुस-या कसोटी सामन्यात 23 व 17 धावा करुन कोहली बाद झाला होता. 

स्टीव्ह स्मिथ 929 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे तर कोहली 919 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूट 851 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. 

 

संबंधित बातम्या