धोनीवर टीका म्हटलं की लोकं एका पायावर तयार : कोहली

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

''महेंद्रसिंह धोनीने केवळ एक सामन्यात चांगली कामगिरी केली नाही की लोकं टीका करायला सरसावतात. मात्र, त्यांनी थोडा धीर धरायला हवा,'' अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीची पाठराखण केली आहे. 

नवी दिल्ली : ''महेंद्रसिंह धोनीने केवळ एक सामन्यात चांगली कामगिरी केली नाही की लोकं टीका करायला सरसावतात. मात्र, त्यांनी थोडा धीर धरायला हवा,'' अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहलीने धोनीची पाठराखण केली आहे. 

कोहलीसाठी धोनी भारतीय संघात अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळेच कोहली वेळोवेळी त्याला पाठींबा देत आला आहे. याबाबात तो म्हणाला की धोनीवर झालेली टीका अत्यंत दुर्दैवी आहे. 

तो म्हणाला,'' धोनीवर टीका करणे अत्यंत दुर्दैवी आहे. माझ्यामते, धोनीवर टीका करताना लोकांचा संयम ढळतो. एका सामन्यात तो अपयशी ठरला की लोकं टीका करायला लगेच तयार असतात. मात्र, धोनी क्रिकेटविश्वातील सर्वांत स्मार्ट खेळाडू आहे. मी नेहमी सांगत आलो आहे की यष्टीरक्षणात धोनीची बरोबरी कोणीही करु शकत नाही. त्याच्यामुळे मला मोकळेपणाणे खेळता येते. त्याच्या अनुभवाचा मला नेहमीच उपयोग होतो.''
 

संबंधित बातम्या