INDvsSA : डबल बोनससह विराटची घोडदौड बघा आकड्यांत

मुकुंद पोतदार
Friday, 11 October 2019

- 26 वे कसोटी शतक
- कर्णधार म्हणून 40 आंतरराष्ट्रीय शतके काढलेला पहिला भारतीय
- एकूण क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग 41 शतकांसह आघाडीवर
- कसोटीत कर्णधार म्हणून 19वे शतक

पुणे : विराट कोहलीने वर्षातील पहिल्या शतकाची प्रतिक्षा अखेर संपुष्टात आणली आणि मग द्विशतकासह डबल बोनस देत सुमारे सात हजार चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला.

INDvsSA : पुणं पावलं; विराटनं ठोकलं सातवं द्विशतक 

पहिल्या दिवसाअखेर विराट 63 धावांवर नाबाद होता. त्याने पहिल्या सत्रात शतक पूर्ण केले, तर चहापानानंतर पुढील शतकी पल्ला गाठला. 

विराटची घोडदौड आकड्यांत अशी : 
- 26 वे कसोटी शतक
- कर्णधार म्हणून 40 आंतरराष्ट्रीय शतके काढलेला पहिला भारतीय
- एकूण क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा रिकी पाँटिंग 41 शतकांसह आघाडीवर
- कसोटीत कर्णधार म्हणून 19वे शतक
- पाँटिंगच्या उच्चांकाशी बरोबरी. दक्षिण आफ्रिकेचा ग्रॅमी स्मिथ (25) आघाडीवर
- वन-डेमध्ये नेतृत्व करताना विराटची 21 शतके
- 26 कसोटी शतकांचा टप्पा गाठताना सुनील गावसकर यांचा उच्चांक पार
- गावसकर यांची 144 डावांत 26 शतके. या क्रमवारीत अनुक्रमे डॉन ब्रॅडमन (69 डाव), स्टीव स्मिथ (121), सचिन तेंडुलकर (136) यांच्यानंतर विराट (138) 
- भारतातर्फे सर्वाधिक कसोटी धावांच्या क्रमवारीत दिलीप वेंगसरकर यांचा उच्चांक पार
- वेंगसरकर यांच्या 16 कसोटींत 6898 धावा

Virat Kohli

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाऊस कोसळणार अशी शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, पुण्यात पावसाऐवजी भारताचा कर्णधार विराट कोहलीच आफ्रिकेच्या गोलंदाजांवर बरसला. त्याने कसोटी क्रिकेटमधील सातवे द्विशतक झळकाविले आहे. 

त्याने 295 चेंडूमध्ये द्विशतक साजरे केले. त्याने आफ्रिकेच्या कोणत्याच गोलंदाजाला समोर टिकू दिले नाही. कोहलीचे 81 कसोटी सामन्यांमधील हे सातवे द्विशतक आहे. 


​ ​

संबंधित बातम्या