INDvsSA : पुण्यात 'रनमशीन बरसली'; विराटची आणखी एक सेंच्युरी

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी आफ्रिकेला पाणी पाजलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित अपयशी ठरला मात्र, मयांकने पुन्हा शतक केलं. त्यानंतर विराट कोहलीनंही कसोटी कारकिर्दीतील 26वं शतक झळकाविलं. 

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयांक अगरवाल आणि रोहित शर्मा यांनी आफ्रिकेला पाणी पाजलं. त्यानंतर दुसऱ्या कसोटी सामन्यात रोहित अपयशी ठरला मात्र, मयांकने पुन्हा शतक केलं. त्यानंतर विराट कोहलीनंही कसोटी कारकिर्दीतील 26वं शतक झळकाविलं. 

विराटनं संघातून वगळलं अन् याने चौकार षटकार बरसवत शतक ठोकलं

दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा कोहली 63 धावांवर होता. खेळाला सुरवात झाल्यावर त्याने तीन षटकांनंतर पहिला चौकार मारला. त्यानंतर कोहलीने आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज असलेल्या रबाडाच्या गोलंदाजीवरही चौकारांची बरसात केली. 

कोहलीने 109 व्या षटकात 173 चेंडूमध्ये मालिकेतील पहिले शतक झळकाविले. हे त्याचे कसोटीतील 26वे शतक आहे. त्याच्या या शतकांत 15 चौकारांचा समावेश होता. पहिल्या दिवशी मयांकचे शतक, आज कोहलीचे शतक आणि अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा यांच्या योगदानामुळे भारताची धावसंख्या तीनशेपार गेली आहे. 


​ ​

संबंधित बातम्या