विराट कोहली दि रन मशीन

वृत्तसंस्था
Tuesday, 21 August 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात आपले 58वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. याच शतकाबरोबर तो कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या दोन दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 

नॉटिंगहम : भारताचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात आपले 58वे आंतरराष्ट्रीय शतक साजरे केले. याच शतकाबरोबर तो कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या दोन दिग्गजांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. 

या यादीत तो 16 शतकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ या यादीत पहिल्या स्थानावर आहे. त्याने 193 डावांमध्ये 25 शतके केली आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग या यादीत दुसऱ्या स्थानावर असून त्याने 140 डावांमध्ये 19 शतके केली आहेत. विराट कोहलीने कर्णधार म्हणून त्याची 16 शतके अवघ्या 63 डावांत केली आहेत. 

विराट कोहलीने पहिल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात उत्तम कामगिरी केली. त्याल्या फक्त दुसऱ्या सामन्यात अपयश आले होते. पहिल्या आणि तिसऱ्या कसोटी सामन्यात योगायोगाने कोहलीने दोन्ही डावांत मिळून 200 धावा केल्या आहेत. त्याने पहिल्या सामन्यात 149 आणि 51 तर तिसऱ्या सामन्यात 97 आणि 103 धावा केल्या. 

कोहलीचे माईलस्टोन :

 • कसोटी क्रिकेटमधील 23वे शतक (69 सामने)
 • इंग्लंडविरुद्ध पाचवे शतक 
 • इंग्लंडमधील दुसरे शतक
 • परदेशातील 13वे शतक
 • यंदाच्या वर्षातील तिसरे शतक
 • कर्णधार म्हणून 16वे शतक
 • सामन्याच्या तिसऱ्या डावातील तिसरे शतक
 • चौथ्या क्रमांकावरील 19वे शतक 
 • प्रथम श्रेणी क्रिकेटमधील 30वे शतक
   

संबंधित बातम्या