कसोटी क्रिकेटच सर्वोत्तम : कोहली

वृत्तसंस्था
Wednesday, 29 August 2018

भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच कसोटी क्रिकेट सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराटने कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. त्याने क्रिकेटच्या पारंपारिक स्वरुपावर सर्वाधिक प्रेम असल्याचे मत व्यक्त केले. 

लंडन : भारताचा कर्णधार विराट कोहलीने नुकतेच कसोटी क्रिकेट सर्वोत्तम असल्याचे मत व्यक्त केले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत विराटने कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत प्रथम स्थान पटकावले आहे. त्याने क्रिकेटच्या पारंपारिक स्वरुपावर सर्वाधिक प्रेम असल्याचे मत व्यक्त केले. 

तो म्हणाला, ''कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यावर मिळणारे समाधान मला शब्दात व्यक्त करणे फार अवघड आहे, कारण कसोटी क्रिकेटमध्ये जास्त आव्हाने असतात. कसोटी क्रिकेट हे क्रिकेटचे सर्वोत्तम स्वरुप आहे. कसोटी क्रिकेट कोठेही नामशेष होताना मला दिसत नाही. कसोटी सामने चार दिवसांचे होतील असेही मला वाटत नाही.''

क्रिकेटला बाजाराचे स्वरुप आल्याबद्दल त्याने खंतही व्यक्त केली तसेच याचा खेळावर परिणाम झाल्याचेही मान्य केले. तो म्हणाला, ''सतत खेळाव्या लागणाऱ्या क्रिकेटमुळे त्याची खरी किंमत झाली आहे.''

प्रथम श्रेणी क्रिकेटचा जास्त प्रसार झाला पाहिजे असेही मत त्याने व्यक्त केले. तो म्हणाला, ''प्रथम श्रेणी क्रिकेटला सुरुवातीपासूनच महत्त्व दिले तरच खेळाडू कसोटी क्रिकेचा कंटाळा करणार नाहीत.''


​ ​

संबंधित बातम्या