World Cup 2019 : म्हणून कोहली पंतऐवजी कार्तिकला नेतोय 'वर्ल्ड कप'ला..

वृत्तसंस्था
Wednesday, 15 May 2019

वर्ल्ड कप 2019 : नवी दिल्ली : विश्वकरंडकासाठी युवा यष्टीरक्ष रिषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकला  जागा देण्यात आली आणि भारतीय क्रिकेटमध्ये वादळ उठलं. पंतला संघातून वगळण्यात आल्याने अनेक जणांच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. अखेर भारताचा कर्णधार विराट कोहलीने याविषयावर मौन सोडले आहे. 

कार्तिककडे पंतपेक्षा जास्त अनुभव असल्यानेच त्याला संघात स्थान मिळाल्याचे त्याने म्हटले आहे. ''त्याने दडपणाखाली चांगला खेळ केला आहे. त्याच्याकडे अनुभव आहे आणि म्हणूनच सर्वमताने त्याची निवड करण्यात आली. जर दुर्दैवाने धोनीला काही झाले तर यष्टीरक्षणात कार्तिककडे खूप अनुभव आहे आणि त्यामुळेच तो यष्टींमागे चांगली कामगिरी करु शकतो. एक फिनिशर म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली आहे,'' अशा शब्दांत त्याने कार्तिकवर विश्वास दाखवला आहे. 

कार्तिककडे असलेल्या अनुभवामुळेच त्याला संघात स्थान देण्यात आले असल्याचे कोहलीने सांगितले. पंतला संघात स्थान देण्यात आले नसल्याने माजी कर्णधार सुनील गावसकरांपासून अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. 

संबंधित बातम्या