विराट कोहलीचा सांभाळत सराव

सुनंदन लेले
Thursday, 16 August 2018

विराट कोहलीवर गेले तीन  दिवस फिजिओ पॅट्रीक फरहात, ट्रेनर शंकर वासू आणि मसाजीस्ट अरुण कानडे यांनी मिळून खूप मेहनत केल्याचे समजले. कप्तान विराट कोहलीला तिसर्‍या सामन्याकरता तंदुरुस्त करायला भारतीय संघ व्यवस्थापन धडपडत असल्याचे जाणवले.

तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय संघाने नॉटींगहॅमच्या ट्रेंटब्रीज मैदानावर तिसर्‍या कसोटीच्या तयारीकरता सराव चालू केला. सरावादरम्यान सर्व पत्रकारांचे लक्ष विराट कोहलीवर होते. विराट कोहलीवर गेले तीन  दिवस फिजिओ पॅट्रीक फरहात, ट्रेनर शंकर वासू आणि मसाजीस्ट अरुण कानडे यांनी मिळून खूप मेहनत केल्याचे समजले. कप्तान विराट कोहलीला तिसर्‍या सामन्याकरता तंदुरुस्त करायला भारतीय संघ व्यवस्थापन धडपडत असल्याचे जाणवले.

0-2 पिछाडीवर पडलेला भारतीय संघ गंभीर चेहर्‍याचने ट्रेंटब्रीज मैदानावर सरावाकरता आला. नॉटींगहॅमला ढगाळ आणि थंड वातावरण होते तरी पावसाने विश्रांती घेतल्याने ट्रेंट ब्रीज मैदानावर भारतीय संघाला सराव करता आला. पत्रकारांचे सर्व लक्ष विराट कोहली काय करतोय याकडे होते. शंकर वासू आणि पॅट्रीक फरहातच्या देखरेखीखाली विराटने काही मोजके व्यायाम केले. नंतर तो बॅट घेऊन काही चेंडू नुसते मारून अंदाज घेत होता. शेवटी सर्व उपकरणे घालून विराटने मोजून 7ते10 मिनिटे फलंदाजीचा सराव केला जेव्हा गोलंदाज नव्हे तर फलंदाजीचा प्रशिक्षक संजय बांगर चेंडू फेकत होता. 

सरावानंतर रवी शास्त्री पत्रकारांशी बोलायला आला. ‘‘मागच्या सामन्यात दोन फिरकी गोलंदाज खेळवायचा आमचा निर्णय चुकीचा होता. फलंदाजांनी तंत्राचा विचार करण्यापेक्षा खेळपट्टीवर उभे राहण्याच्या मंत्राचा विचार जास्त करायला हवा असे मला वाटते. मागचा सामना आम्ही खूप खराब खेळलो. तरीही संघात नकारात्मकता नाहीये. तिसर्‍या सामन्यात जोरदार पुनरागमन करायचे झाल्यास फलंदाजांना जबाबदारी ओळखून खेळ करावा लागले. विराट बाबतीत बोलायचे झाल तर मी इतकेच सांगेन की लंडन मधील सामन्याच्यावेळे पेक्षा आता तो बराच बरा आहे’’, शास्त्री म्हणाला  

सामना चालू व्हायला संपूर्ण दोन दिवस बाकी असताना खेळपट्टी तयार करण्याचे काम जोरात चालू होते. अगदी किंचित हिरवी झाक असलेली खेळपट्टी वजनी रोलर फिरवून टणक करायचा प्रयत्न केला जात होता. 2007 साली याच मैदानावरचा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने मालिका जिंकली होती. त्यानंतर 2011 आणि 2014 साली याच मैदानावर इंग्लंडने मोठे विजय मिळवले होते. म्हणजेच भारतीय संघाचे ट्रेंटब्रीज मैदानाशी सख्यं नाही आणि वैर नाही असेच म्हणावे लागेल. 

दरम्यान बेन स्टोकस मारहाणीच्या आरोपातून मुक्त झाल्याने इंग्लंड संघात दाखल झाला आहे. सॅम करन आणि ख्रिस वोकसने गेल्या सामन्यात केलेल्या कामगिरीकडे बघता बेन स्टोकसला खेळायची संधी कशी देता येईल ही ज्यो रुटला डोकेदुखी आहे.


​ ​

संबंधित बातम्या