शब्दांतून व्यक्त झाल्यानंतर विराटने धोनीसाठी शेअर केला खास व्हिडिओ

सुशांत जाधव
Monday, 17 August 2020

कधी कधी आयुष्यात एखाद्या क्षणी नेमकं काय बोलाव हे सूचत नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर माझी अवस्था देखील अशीच झाली आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीच्या निवृत्तीनंतर रन मशिन विराट कोहलीनं त्याच्याबद्दल आदर व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला आहे. धोनी माझा कॅप्टन होता..आहे आणि कायम राहिल अशी भावना टीम इंडियाच्या विद्यमान कर्णधाराने व्यक्त केली आहे. धोनीने कर्णधारपद सोडल्यानंतर भारतीय संघाची धूरा ही विराटच्या खांद्यावर आली होती. महेंद्र सिंह धोनी विराटच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरल्याचेही पाहायला मिळाले. भारतीय संघात दोन-दोन कॅप्टन अशी चर्चाही त्यावेळी रंगली होती. यावेळी ही धोनीच माझा कर्णधार असल्याची प्रतिक्रियाही विराटने दिली होती. विराट कोहलीचा भावनिक आणि आपल्या माजी कर्णधाराबाबत आदर व्यक्त करणारा व्हिडिओ बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन शेअर केलाय. 

आगामी लोकसभेसाठी धोनीला भाजप नेत्याकडून ऑफर

कधी कधी आयुष्यात एखाद्या क्षणी नेमकं काय बोलाव हे सूचत नाही. धोनीच्या निवृत्तीनंतर माझी अवस्था देखील अशीच झाली आहे. धोनी बसमध्ये नेहमी मागच्या सीटवर बसायचा. तो जास्त काही बोलायचा नाही. तो आमच्यासोबत असणारा क्षण ऊर्जा निर्माण करणारा असायचा. संघाला विजय मिळवूण देण हेच आमचे ध्येय होते. त्यामुळे आमच्यात चांगली मैत्री झाली. सुरुवातीच्या काळात धोनीने आवश्यक वेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले, अशा शब्दात विराट कोहलीने धोनीच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  यापूर्वी देखील विराटने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या होत्या. प्रत्येक क्रिकेटला एका क्षणी थांबायचे असते. पण तुमच्या अगदी जवळचा माणूस ज्यावेळी अशा प्रकारचा निर्णय घेतो तो एक भावनिक क्षण असतो. धोनीचे योगदान हे अविस्मरणीय आहे, असा उल्लेखही त्याने ट्विटमध्ये केला होता.  

इंग्लंडचा क्रिकेटपटू म्हणतो, 'राहुल द्रविडच्या ई-मेलनं आयुष्याला कलाटणी मिळाली' 

महेंद्र सिंह धोनीने सर्व प्रथम आंतरराष्ट्री कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर त्याने मर्यादित षटकांच्या खेळातून कर्णधार पद सोडले. तो विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाकडून काही सामनेही खेळला. यावेळी तो यष्टीमागून संघाला मार्गदर्शन करताना दिसायचा. विराट कोहली खरा कर्णधार असला तरी फिल्डवर धोनीच कर्णधार असल्याचे तमाम क्रिकेट चाहत्यांनी अनेक सामन्यात अनुभवले. धोनीच्या यष्टीमागील मार्गदर्शनामुळे टीम इंडियाला अनेक सामन्यात फायदाही झाला होता.  


​ ​

संबंधित बातम्या