INDvsSA : विराटचा हायेस्ट स्कोअर; सचिन, सेहवागलाही केले ओव्हरटेक

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

कसोटी कारकिर्दीत सातव्या द्विशतकासह विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा उच्चांक पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने ही कामगिरी केली. याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांचा उच्चांक पार केले. सचिन आणि सेहवाग यांनी प्रत्येकी सहा द्विशतके काढली होती.

पुणे : कसोटी कारकिर्दीत सातव्या द्विशतकासह विराट कोहलीने कसोटी कारकिर्दीतील सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचा उच्चांक पार केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी विराटने ही कामगिरी केली. याचबरोबर त्याने सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांचा उच्चांक पार केले. सचिन आणि सेहवाग यांनी प्रत्येकी सहा द्विशतके काढली होती.

INDvsSA : डबल बोनससह विराटची घोडदौड बघा आकड्यांत

विराटची यापूर्वीची सर्वोच्च धावसंख्या 243 होती. विराट हा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध द्विशतक काढलेलाल पहिला भारतीय कर्णधार बनला. आफ्रिकेविरुद्ध द्विशतक काढलेला तो तिसरा भारतीय बनला. यापूर्वी सेहवागने 2008 मध्ये सेंच्युरीयन कसोटीत 319, तर या मालिकेत विशाखापट्टणमला पहिल्या कसोटीत मयांक अगरवालने 215 धावा केल्या होत्या.

विराटची यापूर्वीची द्विशतके :
200 विरुद्ध वेस्ट इंडिज नॉर्थ साऊंड 21 जुलै 2016
211 विरुद्ध न्यूझीलंड इंदूर 8 ऑक्टोबर 2016
235 विरुद्ध इंग्लंड मुंबई 8 डिसेंबर 2016
204 विरुद्ध बांगलादेश हैदराबाद 9 फेब्रुवारी 2017
213 विरुद्ध श्रीलंका नागपूर 24 नोव्हेंबर 2017
243 विरुद्ध श्रीलंका दिल्ली 2 डिसेंबर 2017

Image

- कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या क्रमवारीत पाकिस्तानच्या इंझमाम उल हक (25) याला मागे टाकले
- इंझमामची 120 कसोटी, 200 डावांत 25 शतके
- गॅरी सोबर्स आणि स्टीव स्मिथ यांचीही प्रत्येकी 26 शतके

 


​ ​

संबंधित बातम्या