चॅपेल म्हणतात, विराटच सर्वोत्तम फलंदाज

वृत्तसंस्था
Sunday, 26 August 2018

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज असल्याचा निर्वाळा भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी  दिला आहे. एकेकाळी ग्रेग चॅपेल यांना भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा दुश्मन समजले जायचे. त्यांनीच आता भारतीय कर्णधाराची स्तुती केली आहे.

नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली हा सध्याच्या काळातील क्रिकेटमधला सर्वोत्तम फलंदाज असल्याचा निर्वाळा भारताचे माजी प्रशिक्षक आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी  दिला आहे. एकेकाळी ग्रेग चॅपेल यांना भारतीय क्रिकेटचा सर्वात मोठा दुश्मन समजले जायचे. त्यांनीच आता भारतीय कर्णधाराची स्तुती केली आहे.

ग्रेग चॅपेल यांनी म्हटले आहे की, विराट कोहली हा सध्या चांगल्या फॉर्मात आहे आणि तो सध्याच्या वेळचा सर्वोत्तम फलंदाज असून तो परदेशी खेळपट्टीवरही सर्वोत्तम कामगिरी करत आहे. सध्याच्या जगातील क्रिकेटमधील तो क्रमांक एकचा फलंदाज असल्याचेही त्यानी म्हटले आहे. त्याचबरोर, त्यांनी नॉटिंगहममधील सामन्यात विराटने केलेल्या दोन्ही डावातील फलंदाजीची स्तुती केली आहे. 

तिसऱ्या सामन्यात विराट कोहली इंग्लंडला नमवून सामने जिंकणाऱ्यांच्या यादीत तो भारताकडून आता दुसऱ्या क्रमांकाचा कर्णधार बनला आहे. तिसऱया सामन्यात विराट कोहली आणि रहाणे यांच्यात झालेली भागीदारी हा सामन्याचा टर्निंग पॉइंट होता. त्यावेळी ही भागीदारी झाला नसती तर भारत सामन्यात मागे पडला असता, असे चॅपेल यावेळी म्हणाले. 

दरम्यान, विराट कोहलीने 2014 नंतर इंग्लंडच्या प्रत्येक गोलंदाजाची चांगलीच धुलाई केलेली आहे. इंग्लंडसोबत त्यांच्याच देशात चालू असलेल्या मालिकेतही विराटने आतापर्यंत 3 सामन्यात 2 शतके आणि 2 अर्धशतकाच्या मदतीने एकूण 440 धावा काढल्या आहेत.


​ ​

संबंधित बातम्या