विराट कोहलीला आता 'शोले' मधील नाण्याची गरज

शैलेश नागवेकर
Friday, 7 September 2018

इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका विजयाचे दैव आजमावून पहात असलेल्या भारतीय कर्णधारासाठी सर्व फासे उलटेच पडताना दिसून येत आहे. मायदेशात अभूतपूर्व यश मिळवून कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवले खरे, परंतु काही महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि आता इंग्लंडमध्ये मालिका गमावण्याची वेळ त्याच्यावर आली.

लंडन : इंग्लंड दौऱ्यात कसोटी मालिका विजयाचे दैव आजमावून पहात असलेल्या भारतीय कर्णधारासाठी सर्व फासे उलटेच पडताना दिसून येत आहे. मायदेशात अभूतपूर्व यश मिळवून कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थान मिळवले खरे, परंतु काही महिन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेत आणि आता इंग्लंडमध्ये मालिका गमावण्याची वेळ त्याच्यावर आली. फलंदाजांचे अपयश हे प्रमुख कारण इंग्लंड दौऱ्यातील अपयशास कारणीभूत धरले जात असले तरी क्रिकेट सामन्याची सुरुवात ज्या नाणेफेकीने होत असते त्याचे फासेही विराटसाठी उलटेच पडत आहे.

या इंग्लंड दौऱ्यात पाचही कसोटी सामन्यात त्याने नाणेफेक गमावली. क्रिकेट सामन्यात नाणेफेक यजमान संघाचा कर्णधार करत असतो तर पाहुण्या संघाचा कर्णधार हेडस् किंवा टेल्स (छापा की काटा) बोलत असतो. इंग्लंड दौऱ्यात विराट नाणे हवेत उडवल्यावर जे जे बोलत होता त्याच्या नेमके उलटे घडत होते. विराटच्या या चुकीच्या `कॉल`मुळे अनेकांना ब्लॉकबस्टर आणि सदाबहार चित्रपट शोलेमधील अमिताभ बच्चन यांच्याकडे असलेल्या नाण्याची आठवण झाली. त्या नाण्याच्या दोन्ही बाजुला एकच चित्र होते. हे नाणे जर विराटसाठी इंग्लंड दौऱ्यात वापरण्यात आले असते तर कदाचीत त्याच्या बाजूने कल लागला असता असे गमतीत बोलले जात आहे. 

काहीही असो आजपासून सुरु झालेल्या पाचव्या कसोटी सामन्यातही नाणेफेक गमावणारा विराट आता लाला अमरनाथ आणि कपिलदेव या भारतीय कर्णधारांच्या पंक्तीत जाऊन बसला आहे. या दोन्ही कर्णधारांनी मालिकेतील सर्वच सामन्यात नाणेफेक गमावली होती.

त्याला तपशील असा
लाला अमरनाथ विरुद्ध जॉन गोडार्ड (वेस्ट इंडींज) 1948-49
कपिलदेवव विरुद्ध क्लाईव लॉईड (वेस्ट इंडिज) 1982-83
विराट कोहली विरुद्ध ज्यो रुट (2018)


​ ​

संबंधित बातम्या