विराटलाही लॉकडाऊनचा फटका बसण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

कोरोनाचा फटका क्रीडा क्षेत्राला बसत असल्याचं दिसत आहे. बहुचर्चित आणि लोकप्रिय आयपीएलचे घोंगडे अजून भिजत पडललेले आहे. अनिश्‍चितता कायम असली, तरी तरी अधूनमधून आशेचा किरण दिसून येत आहे. 

नवी दिल्ली - कोरोना महामारीचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष परिणाम सर्वच क्षेत्रांवर झालेला आहे. व्यवहार सुरू करण्यासाठी अनलॉक झाले असले, तरी भारताचे क्रिकेट मात्र अजूनही लॉकडाऊनमध्ये आहे. परिणामी एरवी जाहिरात क्षेत्रात आघाडीवर असलेल्या विराट कोहली आणि कंपनीचा ब्रॅंड 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. 

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅंडसच्या अहवालानुसार सेलिब्रेटींनी आपली रक्कम 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी करावी, अशी काही कंपन्यांची मागणी आहे; तर काही कंपन्या हीच रक्कम 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावी, असे सूतोवाच करत आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेही काही जाहिरातदार 20 ते 30 टक्के कमी करण्याची मागणी करतील, असे म्हटले जात आहे.

हे वाचा - धक्कादायक! मेस्सी बार्सिलोनाचा निरोप घेणार? 

विराट कोहली किंवा रोहित शर्माच नव्हे, तर अनेक सेलिब्रेटींच्याही ब्रॅंडला कोरोनाचा अप्रत्यक्ष फटका बसत असल्याचे एका सर्वेक्षण अहवातून स्पष्ट होत आहे. बहुचर्चित आणि लोकप्रिय आयपीएलचे घोंगडे अजून भिजत पडललेले आहे. अनिश्‍चितता कायम असली, तरी तरी अधूनमधून आशेचा किरण दिसून येत आहे. आयपीएल झाली तर विराट आणि कंपनीची ब्रॅंड व्ह्यॅल्यू सुधारू शकेल, असेही सर्वेक्षणात नमुद करण्यात आले आहे. 

क्रिकेटर्सना अधिक पसंती 
सेलिब्रेटी ब्रॅंडमध्ये अभिनेता अक्षय कुमार, दीपिका, रणवीर, रणबीर सिंग, अमिताभ बच्चन यांना अधिक पसंती असते; परंतु 50 टक्के ब्रॅंडस्‌ पसंती यंदाची आयपीएल झाली नाही, तरी क्रिकेटपटूंसाठीच असेल, असे या सर्वेक्षणात म्हणण्यात आले आहे. कोरोनामुळे मार्केटवर मोठा परिणाम झालेला असला, तरी 55 टक्के कंपन्या सेलिब्रेटीज आपले सदिच्छादूत असावेत, यासाठी आग्रही आहेत. 

हे वाचा - मोदींच्या लडाख दौऱ्यावर धवनने दिली रिअ‍ॅक्शन; ट्विट होतय व्हायरल

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ह्युमन ब्रॅंडच्या अहवालानुसार सेलिब्रेटींनी आपली रक्कम 20 ते 30 टक्‍क्‍यांनी कमी करावी, अशी काही कंपन्यांची मागणी आहे; तर काही कंपन्या हीच रक्कम 50 टक्‍क्‍यांपर्यंत कमी करावी, असे सूतोवाच करत आहेत. महेंद्रसिंग धोनी आणि रोहित शर्मा यांचेही काही जाहिरातदार 20 ते 30 टक्के कमी करण्याची मागणी करतील, असे म्हटले जात आहे.


​ ​

संबंधित बातम्या