आता विराट 'कर्णधार' म्हणून सपशेल निष्प्रभ..! : गावसकर

वृत्तसंस्था
Tuesday, 4 September 2018

इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमाविल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका करत आता त्याचा कर्णधार म्हणून छाप राहिली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी एकटा विराट कोहलीच सारखा सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही. तोही मनुष्यच आहे असेही म्हटले आहे.

साउदम्पटन : इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका गमाविल्यानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी कर्णधार विराट कोहलीच्या कर्णधारपदावर टीका करत आता त्याचा कर्णधार म्हणून छाप राहिली नसल्याचे म्हटले आहे. मात्र, त्यांनी एकटा विराट कोहलीच सारखा सर्वोत्तम कामगिरी करू शकत नाही. तोही मनुष्यच आहे असेही म्हटले आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा संघ 3-1 ने आघाडीवर आहे. चौथ्या कसोटीतही भारताला 60 धावांनी पराभव स्वीकारावा लागल्यानंतर संघाच्या कामगिरीवर जोरदार टीका होत  आहे. या मालिकेत विराट कोहली व्यतिरिक्त एकही भारतीय फलंदाजाला सातत्यपूर्ण फलंदाजी करता आलेली नाही. त्याने चार सामन्यांत 544 धावा केल्या आहेत. सुनील गावसकर यांनी विराटच्या कामगिरीचे कौतुक केले आहे, पण इतर फलंदाजांवर जोरदार टीका केली आहे. 

गावसकर म्हणाले, की तुम्ही पाच स्पेशालिस्ट फलंदाज घेऊन संघात खेळत असताना एकच खेळाडूवर कसे काय अवलंबून असू शकता. सतत तो एकटाच कामगिरी करू शकत नाही, तोही मनुष्य आहे. विराटच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वात आता ते गुण राहिलेले नाहीत. वेस्ट इंडीज, श्रीलंकेविरुद्ध विजय मिळविणे सोपे असते. पण, त्याची खरी कसोटी दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात लागणार होती. त्याला दक्षिण आफ्रिकेत आणि इंग्लंडमध्ये अपयश आले आहे. त्याने कर्णधारपद मिळाल्यानंतर संघात जोश भरण्याचे काम केले. पण जेव्हा पूर्ण संघ यशस्वी होत असतो, तेव्हाच कर्णधार म्हणून य़श मिळत असते.


​ ​

संबंधित बातम्या