'द वॉल' अबाधितच; 4 वर्षांनी विराटचा गोल्डन 'डक'

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

लंडन : द वॉल अर्थात राहुल द्रविडचा विक्रम मोडण्याची संधी चालून आलेल्या कर्णधार विराट कोहलीला मोडण्यात अपयशी ठरला आणि विराट चक्क चार वर्षांनी शून्यावर बाद झाला. 

इंग्लंड दौऱ्यात आतापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला पाचव्या सामन्याच्या दुसऱ्या डावात भोपळाही फोडता आला नाही. या दौऱ्यात आतापर्यंत 593 धावा करणाऱ्या विराटला सहाशे धावांचा टप्पा पार करण्यासाठी अवघ्या सात धावांची, तर राहुल द्रविडच्या एका मालिकेत सर्वाधिक धावा करण्याच्या (602 धावा) विक्रम मोडण्याची संधी होती. पण, विराट अपयशी ठरला.

इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याला पहिल्याच चेंडूवर माघारी पाठविले. विराट स्लीपमध्ये झेल देऊन बाद झाला. त्यामुळे भारताची अवस्था 2 बाद 3 अशी झाली. पाचव्या सामन्यातही भारत जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर आहे. विराट या दौऱ्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पहिला आहे. पण, तो द्रविडच्या विक्रमापासून दूर राहिला. विराटने या मालिकेत 2 शतक आणि 3 अर्धशतकांसह 593 धावा केल्या आहेत. इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा द्रविडच्या नावावर आहेत. त्याने 2002 च्या इंग्लंड दौऱ्यावर 4 कसोटी सामन्यांत 3 शतक व 1 अर्धशतक करताना 602 धावा केल्या होत्या. 

विराटचा चार वर्षांनी गोल्डन डक
विराट कोहली तब्बल चार वर्षांनंतर शून्यावर बाद झाला आहे. कोहली 2014 च्या लॉर्ड्स कसोटीत विराट पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता आणि त्यानंतर चार वर्षानंतर तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला. शुन्यावर बाद होण्याची विराटची ही तिसरी वेळ आहे.

​ ​

संबंधित बातम्या