शून्य गुणांनंतरही कोहलीला "खेल रत्न' 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 21 September 2018

नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारासाठी कितीही सुरळीत पद्धत वापरायची झाली, तरी वाद हे होतच राहणार हे या वेळी पुन्हा एकदा दिसून आले. "खेल रत्न'साठी पुरस्कार समितीकडून केवळ राहुल द्रविड आणि मीराबाई चानू यांच्या नावाला पसंती मिळाल्यावर सर्वांच्या भुवया उंचावल्या. 

राष्ट्रीय पुरस्कारांची निवड करताना आतापर्यंत कदीच गुणांची पद्धत अवलंबविण्यात आली नव्हती. या वेळी प्रथमच गुणांनुसार खेळाडूंची पुरस्कारासाठी वर्णी लावण्यात आली आणि येथेच वादाला तोंड फुटले. 

"खेल रत्न' पुरस्कार जाहीर झालेल्या क्रिकेटपटू विराट कोहलीच्या नावावर चक्क शून्य गुण आहेत. मीराबाई चानूला 44 गुण आहेत, असे असताना या दोघांनाही हा पुरस्कार जाहिर झाला आहे आणि आता त्याचे वितरणही होईल. 

"खेल रत्न' पुरस्कारासाठी अन्य सहा खेळाडू शर्यतीत होते. एका दैनिकाने दिलेल्या माहितीनुसार या प्रत्येकाचे गुण कोहली, चानूपेक्षा अधिक आहेत. बजरंग पुनिया आणि विनेश फोगट या कुस्तीरांचे सर्वाधिक 80 गुण होतात. पुरस्काराच्या शर्यतीत असलेल्या खेळाडूंपैकी हे सर्वाधिक गुण आहेत. इतकेच नाही, तर पॅरा ऑलिंपियन दीपा मलिक (78.4), टेबल टेनिसपटू मनिका बात्रा (65), बॉक्‍सर विकास क्रिशन (52), तिरंदाज अभिषेक वर्मा (55.3) यांचे गुणही कोहली, चानूपेक्षा अधिक आहेत. 

क्रिकेटला झुकते माप 

क्रिकेट नेहमीच स्वतःला वेगळे समजत आले आहे. आम्ही स्वायत्त आहोत असेच बीसीसीआय सतत सांगत असते आणि त्यामुळेच राष्ट्रीय पुरस्काराच्या कुठल्याच गुणांकन पद्धतीत क्रिकेट बसत नाही. हा ऑलिंपिक खेळही नाही. केव पुरस्कार समितीमधील सदस्यांच्या मतानुसार क्रिकेटपटूच्या गळ्यात पुरस्कार पडतो. कोहलीचे नाव असेच निश्‍चित करण्यात आले. विशेष म्हणजे 2016, 2017मध्येही कोहलीचे नाव वगळण्यात आले आले होते. 

सरकारला संध्याकाळपर्यंतची मुदत 

बजरंग पुनिया याने आज क्रीडा मंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांची भेट घेतली. या भेटीत त्याच्याबरोबर गुरु योगेश्‍वर दत्त देखील होता. क्रीडा मंत्र्यांना आपल्याला खेल रत्न पुरस्कार का डावलला याबाबत आपण थेट विचारणा केल्याचे बजरंगने सांगितले. त्या वेळी तुझे गुण कमी पडल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हा बजरंगने आपले गुण सर्वाधिक असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणले. त्यावेळी क्रीडा मंत्र्यांनी लक्ष घालण्याचे अश्‍वासन दिले, असे पुनिया म्हणाला. सरकारकडून आज संध्याकाळपर्यंत काही उत्तर न मिळाल्यास आपण शनिवारी न्यायालयाचा रस्ता धरणार आहोत, असे बजरंगने स्पष्ट केले.

संबंधित बातम्या