सर्वोत्तम संघाबाबत विराट संतापत म्हणाला, तुम्हीच सांगा?

वृत्तसंस्था
Wednesday, 12 September 2018

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ''हाच का तो सर्वोत्तम कसोटी संघ?'' असा प्रश्न विचारल्यावर विराट कोहली भलताच चिडला आणि त्याने पत्रकारालाच उलट प्रश्न केला. 

लंडन : इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ''हाच का तो सर्वोत्तम कसोटी संघ?'' असा प्रश्न विचारल्यावर विराट कोहली भलताच चिडला आणि त्याने पत्रकारालाच उलट प्रश्न केला. 

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडचा पराभव केल्यावर हुरळून गेलेले भारताचे मार्गदर्शक रवी शास्त्री यांनी सध्याचा संघ हा गेल्या 15 वर्षातील भारताचा सर्वोत्तम कसोटी संघ असल्याचे विधान केले होते. अखेरच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत कोहलीला याचबद्दल प्रश्न विचारण्यात आला. एका पत्रकाराने कोहलीला विचारले, ''भारताचा गेल्या 15 वर्षातील सर्वोत्तम कसोटी संघ  असल्याच्या अपेक्षांचे तुमच्यावर दडपण येते का? हा भारतीय संघ खरंच गेल्या 15 वर्षांतील सर्वोत्तम आहे का?'' असा प्रश्न विचारल्यावर विराट कोहली भलताच चिडला. 

''आपण सर्वोत्तम आहोत असे सर्वांनीच मानायला हवे आणि हा आपला सर्वोत्तम भारतीय संघ आहे असे तुम्हाला वाटत नाही का? असा उलटप्रश्न कोहलीने त्या पत्रकाराला विचारला. यावर त्या पत्रकाराने 'नाही' असे उत्तर दिल्यावर विराटचा पारा चढला आणि त्याने ''हे तुमचे मत आहे, माझे नाही.'' असे म्हणत प्रश्न बदलला.  


​ ​

संबंधित बातम्या