INDvsSA : शतकांमागून शतक, विराटने आता गाठले स्टीव्ह स्मिथला

वृत्तसंस्था
Friday, 11 October 2019

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी शतक झळकावित भारताचा कर्णधार विराट कोहली याने समकालीन प्रतिस्पर्धी स्टीव स्मिथ याला गाठले.

पुणे : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात दुसऱ्या दिवशी शतक झळकावित भारताचा कर्णधार विराट कोहली याने समकालीन प्रतिस्पर्धी स्टीव्ह स्मिथ याला गाठले.

INDvsSA : मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल; कोहलीला रहाणेची सुरेख साथ

विराटचे हे कारकिर्दीतील 26वे शतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकांच्या क्रमवारीत सचिन तेंडुलकर 200 कसोटींमध्ये 51 शतकांसह आघाडीवर आहे. विराटने 81व्या कसोटीतील 138व्या डावात 26 वे शतक काढले. त्याने 22 अर्धशतकेही काढली आहेत. स्मिथने मात्र 26 शतकांसाठी 68 कसोटी व 124 डाव घेतले आहेत.

आयसीसी जागतिक क्रमवारीत स्मिथ अव्वल स्थानावर आहे. विराटचा दुसरा क्रमांक आहे. स्मिथचे रेटींग 937, तर विराटचे 903 आहे. या शतकामुळे विराटला 34 रेटींगची पिछाडी कमी करण्यास मदत होईल. स्मिथसाठी अॅशेस दौरा फलदायी ठरला. त्याने चार कसोटींमध्ये  तीन शतकांसह 774 धावा फटकावल्या.


​ ​

संबंधित बातम्या