वर्षभरात कोहलीने ठोकल्या 3000 धावा

वृत्तसंस्था
Sunday, 9 September 2018

लंडन : विराट कोहलीने त्याला दिलेल्या 'रनमशीन' या बिरुदाला साजेशी कामगिरी करत एकाच वर्षांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 3000 धावा ठोकल्या आहेत. इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यावरील भारताची पकड सैल झाली असली तरी कर्णधार विराट कोहलीने आणखी एक विक्रम रचला आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 18 हजार धावांचा टप्पा पार केला आहे. 

इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात विराटने ट्वेंटी-20, एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेट मिळून 18 हजार धावा पूर्ण केल्या. विराटने अवघ्या 382 डावांमध्ये ही कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीमुळे क्रिकेटविश्वात 400 पेक्षा कमी डावांत 18 हजार धावा पूर्ण करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. विराटने आपल्या कारकिर्दीतील 15 हजार धावांचा टप्पा करण्यापासून आता 18 अठरा हजार धावांचा टप्पा पार करेपर्यंत अशी कामगिरी करणारा सर्वांत पहिला क्रिकेटपटू आहे. त्याने मागील वर्षी 6 सप्टेंबर रोजी 15 हजार धावांचा टप्पा पार केला होता आणि काल (8 सप्टेंबर) 18 हजार धावांचा टप्पा पार केला. 

पाचव्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजी इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर पुन्ही एकदा शरणागती पत्करली. भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक बाजू लढवत 49 धावा केल्या. मात्र त्यालाही त्यापुढे मोठ्या धावा करण्यात अपयश आले.

​ ​

संबंधित बातम्या