विराटकडून सचिनचा हा विक्रम मोडीत

वृत्तसंस्था
Friday, 31 August 2018

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रम कोण मोडेल, हा प्रश्न विचारल्यानंतर पहिले नाव येते भारताचा कर्णधार विराट कोहलीचे. विराटने आज (शुक्रवार) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सचिनचा एक विक्रम मोडला आहे. 

साउदम्पटन : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे विक्रम कोण मोडेल, हा प्रश्न विचारल्यानंतर पहिले नाव येते भारताचा कर्णधार विराट कोहलीचे. विराटने आज (शुक्रवार) इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात सचिनचा एक विक्रम मोडला आहे. 

विराट कोहली प्रत्येक सामन्यानंतर नवनवे विक्रम आपल्या नावे करत आहे. कसोटी कारकिर्दीतील सहा हजार धावा पूर्ण करण्यासाठी विराटला फक्त सहा धावा आवश्यक होत्या. त्याने आज हा 119 व्या डावांत सहा हजार धावा करण्याचा विक्रम केला. यापूर्वी सचिनच्या नावावर 120 डावांत सहा हजार धावा करण्याचा विक्रम होता. कोहलीने आतापर्यंत 119 डावांत 6000 धावांचा टप्पा पूर्ण केला. विराटने सचिनला मागे टाकत हा विक्रम आपल्या नावावर केला. 

कसोटीत वेगवान सहा हजार धावा करण्याचा विक्रम भारताच्याच लिटील मास्टर सुनील गावसकर यांच्या नावावर आहे. त्यांनी 117 डावांत हा विक्रम केला होता. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विराट सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने आतापर्यंत दोन शतके झळकाविली आहेत. त्याच्या या कसोटीतही मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. कोहलीने या खेळीपूर्वी 69 कसोटी सामन्यातील 118 डावांत फलंदाजी करताना 23 शतकांसह 5994 धावा केल्या होत्या. यादरम्यान विराट कोहलीची सरासरी 55 आहे. कसोटीमध्ये विराट कोहलीची 248 धावांची सर्वोत्तम खेळी आहे.


​ ​

संबंधित बातम्या