सर्वात यशस्वी कर्णधारांच्या यादीत कोहली दुसऱ्या स्थानावर

वृत्तसंस्था
Thursday, 23 August 2018

भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील विजयासह विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील 22वा विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधारांच्या यादीत त्याने सौरभ गांगुलीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

नॉटिंगहम : भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसऱ्या सामन्यातील विजयासह विराट कोहलीने कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमधील 22वा विजय नोंदवला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी भारतीय कर्णधारांच्या यादीत त्याने सौरभ गांगुलीला मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

महेंद्रसिंह धोनी हा 27 विजयांसह या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. त्याने भारताचे 60 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले. गांगुलीने 2000 ते 2005 या काळात भारताचे 49 कसोटी सामन्यांमध्ये नेतृत्व केले असून त्याच्या नावावर 21 विजय आहेत. 

कर्णधार सामने विजय पराभव अनिर्णीत
एम एस धोनी 60 27 18 15
विराट कोहली 38 22 7 9
सौरभ गांगुली 49 21 13 15
महंमद अझरुद्दीन 47 14 14 19
सुनिल गावसकर 47 9 8 30

इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत आणखी दोन सामने बाकी आहेत. विराट कोहलीला धोनीचा विक्रम मोडण्यासाठी आता फक्त पाच कसोटी विजयांची गरज आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला 30 ऑगस्टला सुरवात होणार आहे.     

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यापूर्वी कोहलीने गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली होती मात्र, या सामन्यातील विजयासह कोहलीने गांगुलीला मागे टाकले आहे. महेंद्रसिंह धोनीने 2014मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. त्यानंतर जानेवारी 2015 पासून कसोटी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्यात आले. 

 

संबंधित बातम्या