विराट ठरला वर्षभरात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू

वृत्तसंस्था
Saturday, 11 August 2018

नवी दिल्ली : भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या कसोटी मालिकेत भारताच्या फलंदाजीचा आधारस्तंभ असलेल्या विराट कोहलीने आणखी एक विक्रम आपल्या नावावर केला आहे. कोहलीने यावर्षी कसोटीत सर्वाधिक धावा करण्याचा मान मिळविला आहे.

लॉर्ड्सवर इंग्लंडविरूध्द झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केलेल्या 23 धावांच्या खेळीदरम्यान टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने इंग्लंडच्या जॉनी बेअरस्टोला मागे टाकत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये यावर्षी सर्वाधिक धावा केल्या. कोहलीने या वर्षी 25 डावांमध्ये 1,404 धावा केल्या आहेत. इंग्लंडचा यष्टीरक्षक जॉनी बेअरस्टो विराटपेक्षा 15 धावांना पाठीमागे आहे. 

2018 मध्ये भारताकडून शिखर धवनने 1055 धावा काढल्या आहेत. यावर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या