भगवानने इतनी अच्छी जिंदगी दि है तो... नाचो!  

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक आहे. विराट कोहली नुकताच मैदानात ख्रिस गेलसह नाचताना दिसला होता. त्याबाबत चहल टीव्हीवर बोलताना तो म्हणाला की ''भगवानने इतनी अच्छी जिंदगी दि है तो बस एन्जॉय करो!''

गयाना : भारताचा कर्णधार विराट कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकाविले. हे त्याचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 42वे शतक आहे. विराट कोहली नुकताच मैदानात ख्रिस गेलसह नाचताना दिसला होता. त्याबाबत चहल टीव्हीवर बोलताना तो म्हणाला की ''भगवानने इतनी अच्छी जिंदगी दि है तो बस एन्जॉय करो!''

चहल टीव्हीवर बोलताना कोहली म्हणाला, ''टॉप थ्री पैकी एका तरी मोठी खेळी करायची हा आपल्या संघाचा नेहमीचा फॉर्म्यूला राहिलेला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी नेहमीच हे काम चांगले केले आहे. आजच्या सामन्यात त्यांनी यश आले नाही म्हणून मी मैदानावर टीकून राहणे गरजेचे होते. खरं सांगायला गेलं ती 60-65 धावांनंतर मी थकलो होतो. मात्र, संघासाठी खेळत राहिलो. तुम्ही संघासाठी खेळत असला की तुम्हा आपसुक ताकद मिळते. मला संघासाठी प्रत्येक आघाडीवर सहभाग घ्यायचा आहे.'' 

ख्रिस गेलसोबत केलेल्या डान्सबद्दल बोलताना तो म्हणाला,'' मी मैदानावर नेहमी एन्जॉय करत असतो. मी कर्णधार आहे म्हणून मी असंच उभं राहिलं पाहिजे, असंच वागलं पाहिजे असा विचार मी करत नाही. देवाने एवढं चांगलं आयुष्य दिलं आहे, देशासाठी खेळण्यासाठी एक संधी दिली आहे म्हणूनच मी फक्त एन्जॉय करत आहे. सध्या मी आयुष्यात खूप खुश आहे त्यामुळे जिथेही गाणं लागतं मी नाचायला सुरवात करतो. 


​ ​

संबंधित बातम्या