कोहलीला भासतीये धोनीची कमतरता; म्हणून रोहितकडे मागितली ही मदत

वृत्तसंस्था
Wednesday, 25 September 2019

भारतीय संघात विराट कोहलीला कर्णधार म्हणून यश आले असेल तर त्याच्यात खूप मोठा वाटा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आहे. त्यामुळेच आता त्याच्या अनुपस्थितीत आता कोहलीला त्याची कमतरता चांगलीच भासू लागली आहे. त्यामुळे आता त्याने आणि रवी शास्त्री या दोघांनीही उपकर्णधार रोहित शर्माकडे एक मदतीची विनंती केली आहे. 

नवी दिल्ली : भारतीय संघात विराट कोहलीला कर्णधार म्हणून यश आले असेल तर त्याच्यात खूप मोठा वाटा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा आहे. त्यामुळेच आता त्याच्या अनुपस्थितीत आता कोहलीला त्याची कमतरता चांगलीच भासू लागली आहे. त्यामुळे आता त्याने आणि रवी शास्त्री या दोघांनीही उपकर्णधार रोहित शर्माकडे एक मदतीची विनंती केली आहे. 

बुमराच्या अनुपस्थितीत आफ्रिकेविरुद्ध खेळपट्ट्या कशा असणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शास्त्रीबुवा आणि कोहली यांनी रोहितला संघाच्या निर्णयांमध्ये जास्तीत जास्त सहभाग घेण्याची विनंती केली आहे. जेणेकरुन विराटला भासणारी धोनीची कमतरता कमी होईल. 

संघ व्यवस्थापनाने रोहितला गोलंदाजांशी चर्चा करण्यास सांगितले आहे जेणेकरुन ते सामन्यात कमी चूका करतील. धोनी संघात असताना यष्टींमागून वेळोवेळी गोलंदाजांना टीप्स देत असतो आणि त्यामुळे गोलंदाज चांगली कामगिरी करतात. 

टीम इंडियात याला नाही मिळाली संधी;  आता खेळणार या देशाकडून

आताही रोहित शर्मा संघाच्या निर्णयांमध्ये सहभाग घेतो. हाच सहभाग त्याने वाढवावा अशी विनंती संघ व्यवस्थापनाने केली आहे.


​ ​

संबंधित बातम्या