INDvsWI : बाहेर नुसत्याच चर्चा; मैदानावर रोहित-विराटचा राडा

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-कोहलीने 74 धावांची भागीदारी करत सचिन-विराट जोडीचा आणखी एक विक्रम मोडला. रोहित-कोहली या जोडीची ही एकदिवसीय कारकिर्दीतील 32वी अर्धशतकी भागीदारी ठरली. यापूर्वी सचिन-सेहवागने 31 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत

गयाना : विश्वकरंडक संपल्यापासून भारताचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, ते दोघे मैदानात उतरतात तेव्हा असे काहीच वाटत नाही आणि ते दोघेही धावांचा नुसता पाऊस पाडतात. वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या सामन्यात रोहित आणि कोहलीने सचिन आणि सेहवागला मागे टाकत नवा विक्रम रचला. 

दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-कोहलीने 74 धावांची भागीदारी करत सचिन-विराट जोडीचा आणखी एक विक्रम मोडला. रोहित-कोहली या जोडीची ही एकदिवसीय कारकिर्दीतील 32वी अर्धशतकी भागीदारी ठरली. यापूर्वी सचिन-सेहवागने 31 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत. भारताकडून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकी भागीदारी करण्याचा विक्रम हा सचिन-सौरभ गांगुली या जोडीच्या नावावर आहे. या जोडीने 55 अर्धशतकी भागीदारी केल्या आहेत. 

विराट कोहलीची शतकी खेळी आणि त्यानंतर भुवनेश्वर कुमार व मोहंमद शमीच्या माऱ्यासमोर विंडीजचा संघ गारद झाला. कोहलीने १२५ चेंडूत १२० धावा केल्या तर भुवीने 31 धावा गेत 4 विकेट घेतल्या. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्या विंडीजचा डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. 

 


​ ​

संबंधित बातम्या