विराट, मीराबाईला मिळणार सर्वोच्च क्रीडा पुरस्कार

वृत्तसंस्था
Monday, 17 September 2018

नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि वेटलिफ्टर मीराबाई चानू यांची भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

कोहलीची या पुरस्कारासाठी यापूर्वी 2016 मध्येही चर्चा झाली होती. पण, त्याला त्यावेळी पुरस्काराने हुलकावणी दिली होती. अखेर यंदा त्याला हा पुरस्कार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हा पुरस्कार मिऴविणारा विराट हा सचिन तेंडुलकर (1997) आणि महेंद्रसिंह धोनी (2007) यांच्यानंतरचा तिसरा क्रिकेटपटू आहे.

तर, दुसरीकडे मीराबाई चानू हिने नुकतेच सर्वोत्तम प्रदर्शन करत पदके मिळविली होती. तिने जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धा, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले होते. मात्र, दुखापतीमुळे तिने आशिया क्रीडा स्पर्धेत भाग घेतला नव्हता. मीराबाईच्या याच कामगिरीमुळे तिची खेलरत्नसाठी शिफारस झाली आहे.

संबंधित बातम्या