संघ उत्तम मन:स्थितीत आहे : विराट कोहली

सुनंदन लेले
Tuesday, 31 July 2018

बर्मिंगहॅम : आमची तयारी सराव सगळे मनासारखे झाले असल्याने संघ अत्यंत उत्तम मन:स्थितीत आहे. हा असा संघ आहे जो तरुण असून त्यात भरपूर क्रिकेट खेळल्याचा अनुभव आहे, असे भारताचा कर्णधार विराट कोहली याने सांगितले.

कोहली म्हणाला, की मला माहीत आहे गेल्या दौर्‍यात मला अपेक्षित कामगिरी करायला जमलेले नाही. माझ्या तंत्रातील उणिवांवर योग्य उत्तरे शोधायचा प्रयत्न मी केला आहे. अनावश्यक दडपण आम्ही कोणीच घेणार नाही. कसोटी सामन्यात परिस्थिती सतत बदलत असते. आम्हांला इंग्लंड संघाला टक्कर द्यायची असेल तर सातत्याने सकारात्मक चांगले क्रिकेट खेळायचे आव्हान पेलावे लागेल.      

आदिल रशीद खेळणार : ज्यो रूट
आदिल रशीदला इंग्लंड संघात घोण्यावरून बरीच उलट सुलट चर्चा होत आहे. मी आदिलला एक आक्रमक फिरकी गोलंदाज म्हणून ११ जणांच्या संघात घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय संघ आमच्यासमोर काय आव्हान उभे करू शकतो याची आम्हांला जाणीव आहे. कल्पना आहे की विराट कोहली काय जिद्दीने मालिकेत उतरणार आहे. विराट कोहलीतल्या फलंदाजाला शांत ठेवणे आम्हांला जमायला पाहिजे. मला आशा आहे की इंग्लंड संघाचा एक हजारावा सामना कसोटी बघायला बर्मिंगहॅमचे प्रेक्षक मैदान भरून टाकतील.

संबंधित बातम्या