बिहार, आसाममधील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी विराट व अनुष्काचा पुढाकार  

टीम ई-सकाळ
Thursday, 30 July 2020

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. 

संपूर्ण देश मार्च महिन्याच्या अखेरपासून कोरोनाच्या संकटाला सामोरे जात आहे, आणि त्यातच आता काही राज्यांमध्ये पुरामुळे आणखीन एक मोठे संकट निर्माण झाले आहे. बिहार आणि आसाममध्ये महापुरामुळे अनेक लोक अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघेही पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. 

स्टुअर्ट ब्रॉड 500 विकेट घेणारा सातवा गोलंदाज 

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आज सोशल मीडियावर ट्विट करत, बिहार आणि आसाममधील पुरग्रस्तांसाठी मदत म्हणून काम करणाऱ्या तीन संस्थांना आर्थिक पाठबळ देत असल्याचे म्हटले आहे. देश कोरोनाच्या महामारीचा सामना करत आहे. आणि नेमके याचवेळी पुरामुळे आसाम आणि बिहार मधील अनेक लोकांचे जीवन प्रभावित झाले आहे. त्यामुळे अनुष्का आणि मी पूर पीडित लोकांच्या मदत आणि कल्याणासाठी काम करत असलेल्या संस्थांना पाठिंबा देऊन, अशा लोकांना मदत करत असल्याचे विराटने आपल्या ट्विट मध्ये लिहिले आहे. 

 

दरम्यान, यापूर्वी विराट आणि अनुष्काने कोरोनाग्रस्त लोकांच्या मदतीसाठी म्हणून पीएम केअर्स फंड आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री साहाय्य निधीला मदत केली होती. त्यानंतर आता बिहार आणि आसामच्या काही भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने विराट आणि अनुष्का शर्मा ने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.  

 

 

 


​ ​

संबंधित बातम्या