Virushka Anniversary : सर्वांचा विरोध झुगारत अशी फुलली विरुष्काची लव्हस्टोरी 

वृत्तसंस्था
Wednesday, 11 December 2019

याच विरुष्काच्या लग्नाला आज दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. यांची प्रेमकहाणीसुद्धा कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. त्यांना अनेकांच्या विरेधाचा समना करावा लागला. मात्र, आज त्यांच्याकडे सर्व 'Couple Goals' म्हणून पाहतात. ​

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूडमधील आघाडीची नायिका अनुष्का शर्मा यांची प्रेमकहाणी म्हणजे अनेकांसाठी रोल मॉडेल ठरली आहे. याच विरुष्काच्या लग्नाला आज दोन वर्षं पूर्ण झाली आहेत. यांची प्रेमकहाणीसुद्धा कोणत्या चित्रपटापेक्षा कमी नव्हती. त्यांना अनेकांच्या विरेधाचा समना करावा लागला. मात्र, आज त्यांच्याकडे सर्व 'Couple Goals' म्हणून पाहतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

Image result for virat and anushka photoshoot

या दोघांना अनेक अवघड परिस्थितींचा सामना करावा लागला पण म्हणून यांचे एकमेकांवरील प्रेम कधीच कमी झाले नाही. विराटच्या सामन्यांपासून ते अनुष्काच्या चित्रपटांपर्यंत या दोघांनी एकमेकांना उत्तम साथ दिली आहे. वेळोवेळी या दोघांनी एकमेकांची बाजू घेतली आणि खंबीरपणे एकत्र उभे राहिले. 

INDvsWI : वानखेडेवर आज 'फायनल'; भारतीय संघावर अधिक दडपण 

Related image

1. विराटच्या खराब फॉर्मचे खापर अनुष्कावर फोडले-
जेव्हा विराट आणि अनुष्का यांनी एकमेकांना डेट करण्यास सुरवात केली तेव्हा अनुष्काने विराटच्या सर्व सामन्यांना हजेरी लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, या काळात विराट प्रचंड खराब फॉर्मात होता. त्याच्या खराब खेळाचे सारे खापर क्रिकेटप्रेमींनी अनुष्कावर फोडले. ती स्टेडियममध्ये येते म्हणूनच विराटचे लक्ष विचलीत होऊन तो खार खेळ करतो असे चाहत्यांचे म्हणणे होते. विराट बरेच दिवस काही बोलला नाही मात्र, अखेर त्याने सोशल मीडियातून सर्वांना चांगलेच सुनावले होते. 

2. फारुख इंजिनिअर यांचा अनुष्का, निवड समितीला मुठीत ठेवत असल्याचा आरोप-
भारतीय संघाच्या निवड समितीतील सदस्य अनुष्काचे चहाचे कप उचलतात असा आरोप भारताचे माजी क्रिकेटपटू फारुख इंजिनिअर यांनी केल्यावर खूप वाद झाला होता. अनुष्काने त्यांना मीडियावरुन त्यांना चांगलेच सुनावले होते. त्यानंतर तिला पाठींबा देत विराटनेही एका मुलाखतीत तिची बाजू घेतली होती. तो म्हणाला होता, ''तिची शिकवण आणि मूल्य इतकी महान आहेत की कधीच कोणतेही चुकीचे काम करणार नाही.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

3. रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यावर भडकली अनुष्का-
रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या एका माणसाला अनुष्काने गाडीत बसून चांगलीच बडबड केली होती. मात्र, तिच्या या कृत्याबद्दल चाहत्यांनी तिलाच ट्रोल केले होते. तिने कोणताही विचार न करता त्या माणसाचा व्हिडिओ शेअर केला ज्यात त्या माणसाचा चेहरा सर्व जगाला दिसला. त्यामुळे चाहत्यांनी तिला असंवेदनशील म्हटले होते. मात्र, तरीही विराट तिचयाच बाजूने उभा राहिला. त्याने अजूनही तो व्हिडिओ त्याच्या सोशल मीडियावरुन काढलेला नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Virat Kohli (@virat.kohli) on


​ ​

संबंधित बातम्या