Asian Games 2018 : 'दंगल गर्ल' विनेशची सुवर्णला गवसणी

वृत्तसंस्था
Monday, 20 August 2018

आशियाई स्पर्धांमध्ये कुस्तीपटूंकडून पदकांची सर्वाधिक अपेक्षा असतानाच भारताची विनेष फोगट त्या अपेक्षांवर खरी उतरली आहे. विनेशने 50 किलो वजनी गटात जपानच्या युकी इरी हिला 6-2 असे पराभूत करत भारतासाठी पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. 

जकार्ता : आशियाई स्पर्धांमध्ये कुस्तीपटूंकडून पदकांची सर्वाधिक अपेक्षा असतानाच भारताची विनेष फोगट त्या अपेक्षांवर खरी उतरली आहे. विनेशने 50 किलो वजनी गटात जपानच्या युकी इरी हिला 6-2 असे पराभूत करत भारतासाठी पहिले सुवर्ण पदक पटकावले आहे. 

आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये सुवर्ण पदक पटकावणारी ती पहिली महिला ठरली आहे. इंडोनेशिया येथे सुरु असेल्या आशियाई स्पर्धेतले भारताचे हे दुसरे सुवर्ण पदक आहे. यापूर्वी कुस्तीपटू बजरंग पुनियाने 65 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले आहे. 

सुरवातीपासूनच जबरदस्त खेळ करत विनेशने 4-0 अशा आघाडी घेतली. शेवटच्या 40 सेंकदात दोन गुण कमावत तिने युकीला 6-2 असे पराभत केले.

संबंधित बातम्या