सुवर्णकन्या विनेशने केला विमानतळावरच साखरपुडा

वृत्तसंस्था
Tuesday, 28 August 2018

आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताचे पहिले सुवर्ण मिळवणाऱ्या विनेश फोगटने भारतात परतल्यावर विमानतळावरच साखरपुडा उरकला आहे. शनिवारी (25 ऑगस्ट) विनेशने आपला 24वा वाढदिवस साजरा केला.

नवी दिल्ली : आशियाई स्पर्धेत कुस्तीमध्ये भारताचे पहिले सुवर्ण मिळवणाऱ्या विनेश फोगटने भारतात परतल्यावर विमानतळावरच साखरपुडा उरकला आहे. शनिवारी (25 ऑगस्ट) विनेशने आपला 24वा वाढदिवस साजरा केला. तिने शनिवारी भारतात परत आल्यावर विमातळावरच आपला प्रियकर सोमवीर राठी याच्याशी साखरपुडा केला. 

विनेश आणि सामवीर यांनी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या द्वारावर एकमेकांना अंगठी घातली. त्यानंतर विमानतळावरत केकही कापण्यात आला. 

गेल्या काही दिवसांपासून विनेश आणि भालाफेकपटू नीरज चोप्रा यांच्या संबंधाबद्दल चर्चा केली जात होती. यावर तिने ट्विटरवर नाराजीदेखील व्यक्त केली होती. साखरपुड्यानंतर आता लवकरच विवाह करणार असल्याचेही तिने सांगितले. 

 


​ ​

संबंधित बातम्या