बांगर यांची गच्छंची निश्चित; विक्रम राठोड यांना पसंती

वृत्तसंस्था
Friday, 23 August 2019

भारतीय संघाचे फंलदाजीचे विद्यमान प्रशिक्षक संजय बांगर यांची गच्छंती जवपास निश्‍चित झाली आहे. निवड समितीने आज प्राधान्य क्रमाने सपोर्ट स्टाफची शॉर्टलिस्ट प्राधान्य क्रमाने जाहीर केली त्यात विक्रम राठोड यांना पहिली पसंती दिली असून त्यानंतर बांगर यांना दुसरा क्रमांक दिला आहे. त्याचवेळी विद्यमान बी. अरूण (गोलंदाजी) आणि आर. श्रीधर (श्रेत्ररक्षक) यांचा प्राधान्य क्रम कायम ठेवला आहे.

मुंबई - भारतीय संघाचे फंलदाजीचे विद्यमान प्रशिक्षक संजय बांगर यांची गच्छंती जवपास निश्‍चित झाली आहे. निवड समितीने आज प्राधान्य क्रमाने सपोर्ट स्टाफची शॉर्टलिस्ट प्राधान्य क्रमाने जाहीर केली त्यात विक्रम राठोड यांना पहिली पसंती दिली असून त्यानंतर बांगर यांना दुसरा क्रमांक दिला आहे. त्याचवेळी विद्यमान बी. अरूण (गोलंदाजी) आणि आर. श्रीधर (श्रेत्ररक्षक) यांचा प्राधान्य क्रम कायम ठेवला आहे. 

सपोर्ट स्टाफसाठी इच्छुकांच्या मुलाखतीनंतर एमएसके. प्रसाद यांच्या निवड समितीने शॉर्टलिस्ट असलेल्यांची नावे प्राधान्य क्रमाने जाहीर केली. ही नवी प्रथा यंदा प्रथमच सुरु झाली. त्यानुसार बांगर यांच्याऐवजी राठोड यांना मिळालेली पसंती बांगर यांच्या गच्छंतीचे संकेत देत आहे. 

विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेत उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आल्यानंतर चौथ्या क्रमांकाचा प्रश्‍न व्यवस्थितपणे न सोडवल्याबद्दल फलंदाजीचे प्रशिक्षक बांगर यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्याचवेळेपासून त्यांचे स्थान धोक्‍यात आले होते. 

फलंदजीच्या प्रशिक्षकपदातून मुंबईचे प्रवीण अमरे यांचे नाव जसे मागे पडले, तसे क्षेत्ररक्षण प्रशिक्षकपदातून जॉन्टी ऱ्होडस्‌ यांनाही स्थान मिळालेले नाही. भारतीय संघासोबत असलेल्या सपोर्ट स्टाफमधील संजय बांगर यांच्यासह बी. अरुण (गोलंदाजी) आणि आर. श्रीधर (क्षेत्ररक्षण) हे शर्यतीत कायम आहेत. फिजिओसाठी मुंबईचे नितीन पटेल, अँड्य्रू लिपस पुन्हा इच्छुक आहेत. 

फलंदाजी प्रशिक्षक - विक्रम राठोड, संजय बांगर, मार्क रामप्रकाश. 
गोलंदाजीचे प्रशिक्षक - बी. अरुण, पारस म्हांबरे, व्यंकटेश प्रसाद 
क्षेत्ररक्षण प्रशिक्षक - आर. श्रीधर, अभय शर्मा, टी. दिलीप. 

फिजिओ - नितीन पटेल, अँड्य्रू लिपस, वैभव डागा. 
प्रशासकीय व्यवस्थापक - गिरीश डोंगरे, व्यंकटेश राजागोपालन, आनंद याल्विगी


​ ​

संबंधित बातम्या